TRENDING:

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! 8 हजार महिलांकडून पैसे परत घेणार सरकार, यात तुम्ही तर नाही?

Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हापासूनच चर्चेत आहे. वर्षभरापासून ही योजना सुरु आहे. मात्र यामध्ये अनेक लोकांनी अवैध फॉर्म भरले असल्याची माहिती आहे.
advertisement
1/7
लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! 8 हजार महिलांकडून पैसे परत घेणार सरकार, यात तुम्ही?
राज्यात धुमधडाक्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील अनेक महिलांनी हे फॉर्म भरले. फॉर्म ज्या ज्या महिलांनी भरले त्यांचे सर्वांचे फॉर्म अप्रूव्हही झाले. म्हणजे सरसकटपणे या योजनेचा लाभ मिळाला.
advertisement
2/7
मात्र गेल्या वर्षभरापासून सुरु असलेली ही लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण आता यामधील अनेक महिलांनी निकषांत बसत नसुनही फॉर्म भरल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
3/7
या महिला अवैधपणे सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत. याचा सरकारच्या तिजोरीवर भार येतोय. यामुळे आता सरकार निकषांबाहेरील महिलांची नावे लाडकी बहीण योजनेमधून वगळत आहे.
advertisement
4/7
दरम्यान या योजनेचा लाभ 8 हजार सरकारी कर्मचारी महिलांनीही घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता या महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
advertisement
5/7
राज्य सरकारने त्याच्या अकाउंटमध्ये जेवढे हप्ते जमा केले आहेत. ते सर्व आता सरकार परत घेणार आहे. एकूण 15 कोटी रुपये या हप्त्यांद्वारे सरकारच्या खात्यात येईल. राज्याच्या अर्थ विभागाने हे स्पष्ट केलंय. म्हणूनच या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींच्या चिंता वाढल्या आहेत.
advertisement
6/7
दरम्यान या योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आता सरकारने लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेय. यामध्ये पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणे हे बंधनकारक असेल. केवायसी पूर्ण झाली नाही तर महिलांचं नाव या योजनेतून वगळलं जाणार आहे.
advertisement
7/7
लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारच्या तिजोरीवरील भारही कमी होईल. मात्र यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! 8 हजार महिलांकडून पैसे परत घेणार सरकार, यात तुम्ही तर नाही?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल