Gold Silver Price: दसऱ्याला 1,52,000 रुपयांवर पोहोचले चांदीचे दर, 1 तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय बाजारात सोने 1,21,000 आणि चांदी 1,52,753 प्रति किलोच्या उच्चांकावर. MCX वर विक्रमी वाढ, डॉलर कमजोरी आणि जागतिक तणावामुळे गुंतवणूकदारांना फायदा.
advertisement
1/7

भारतात सोन्याच्या किमती रॉकेटच्या स्पीडने वाढत आहेत. त्याला काही तोड नाही. 1 लाख 21 हजारहून अधिक सोन्याच्या किमती पोहोचल्या आहेत. भारतीय कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीची चमक ऐतिहासिक स्तरावर पोहोचली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीने 1,52,753 प्रति किलोचा नवीन विक्रम नोंदवला आहे
advertisement
2/7
सोन्याचा दरही 1 लाख 21 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीला पोहोचले आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानल्या जाणाऱ्या या दोन्ही धातूंमध्ये आलेली ही जबरदस्त तेजी गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
advertisement
3/7
MCX वर सोने आणि चांदीच्या दरात झालेली ही वाढ गुंतवणूकदारांना मोठा फायदा देत आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, ही तेजी सध्या अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. अल्प काळातचढ-उतार दिसून आले तरी, दीर्घकाळात सोन्या चांदीची चमक अधिक वाढताना दिसत आहे. या वाढत्या गतीमागे नेमकी कोणती कारणे आहेत, ते पाहण्यापूर्वी आपण मागील काही वर्षांतील १ ऑक्टोबरच्या किमतींवर एक नजर टाकूया.
advertisement
4/7
सोन्याच्या किमतीतील ही वाढ किती वेगवान आहे, याचा अंदाज तुम्हाला मागील वर्षांच्या किमतींवरून येईल. 1 ऑक्टोबर 2025 रोजी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1, 17,800 होती. याच्या बरोबर एक वर्ष आधी, 1 ऑक्टोबर 2024 रोजी ही किंमत 77,380 होती. तर, 1 ऑक्टोबर 2023 रोजी 58, 200 रुपये किंमत होती.
advertisement
5/7
मागच्या 10 वर्षांत सोन्याची किंमत जवळपास दुप्पटीहून अधिक झाली आहे. दरवर्षी हळूहळू वाढत गेलेली ही किंमत 2025 मध्ये आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. सोन्या आणि चांदीच्या किमतीत अशी विक्रमी वाढ होण्यामागे अनेक जागतिक आणि स्थानिक घटक कारणीभूत आहेत.
advertisement
6/7
यात डॉलरची कमजोरी हे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय, जगात वाढलेला भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळले आहेत. विदेशी बाजारातही मजबूत खरेदी होत असल्याने या दरांना बळ मिळत आहे.
advertisement
7/7
केवळ भारतीय बाजारच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने आणि चांदी मजबूत स्थितीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलरच्या तुलनेत उच्च स्तरावर व्यापार करत आहे, तर चांदीनेही औंस (Ounce) स्तरावर तेजी दर्शविली आहे. या सर्व परिस्थितीमुळे, सध्या सोने-चांदीचे दर गुंतवणूकदारांसाठी सोनेरी संधी ठरले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Price: दसऱ्याला 1,52,000 रुपयांवर पोहोचले चांदीचे दर, 1 तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?