UPI payment rule change: पेमेंट करायचं नो टेन्शन! ऑटो पे पासून ते लिमिटपर्यंत UPI ने बदलले नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
NPCI ने UPI व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. विमा, कर्ज, कॅपिटल मार्केटसाठी 10 लाख, क्रेडिट कार्ड बिलसाठी 6 लाख, P2P मर्यादा मात्र 1 लाखच कायम आहे. ग्राहकांना मोठी सोय.
advertisement
1/8

रेल्वे तिकीट बुंकिंग, सोने चांदी, LPG या सगळ्याचे नियम आणि दर बदलले आहेत. इतकंच नाही तर रेपो रेटचे दर जैसे थे आहेत. आजपासून अनेक नियम बदलले असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. सध्या सर्वात जास्त upi पेमेंट वापरलं जात आहे. आता याच upi संदर्भातील नियम आजपासून बदलणार आहेत. फसवणूक रोखणे, ग्राहकांना अधिक सोयीचं पेमेंट करता येणं यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
advertisement
2/8
भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीला अधिक सक्षम करण्यासाठी NPCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. UPI वरुन व्यवहार करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या बदलानंतर आता विमा हप्ते, कर्ज, ईएमआय आणि कॅपिटल मार्केटमधील गुंतवणुकीसारखे व्यवहार यूपीआयद्वारे करणं खूप सोपं झालं आहे.
advertisement
3/8
UPI पेमेंट आता 1 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत. दैनंदिन व्यवहार वाढवून 10 लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन मर्यादा प्रामुख्याने पर्सन-टू-मर्चंट (P2M) म्हणजेच Verified Merchant आणि संस्थांना पेमेंट करताना लागू होणार आहे.
advertisement
4/8
विमा पेमेंटसाठी, कर्ज, ट्रॅव्हल पेमेंट, कॅपिटल मार्केट गुंतवणूक या सारख्यांसाठी 5 लाख रुपयांवरुन 10 लाख रुपयांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे. क्रेडिट कार्ड बिल पेमेंट 6 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
advertisement
5/8
NPCI ने या बदलावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, यूपीआय आता देशातील सर्वात पसंतीचा पेमेंट मोड बनला आहे आणि मोठ्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांची मागणी सतत वाढत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उच्च मूल्याचे व्यवहार (High Value Transactions) सोपे करण्यासाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. विशेषतः ५ लाख रुपयांपर्यंतचे कर भरणारे संस्था आणि व्यक्तींना या वाढीव मर्यादेचा फायदा होणार आहे.
advertisement
6/8
UPI द्वारे मोठ्या रकमेचे हस्तांतरण- आजपासून, तुम्ही UPI वापरून एका व्यवहारात ₹५ लाख (अंदाजे $१००,००० USD) पर्यंत पाठवू शकता. पूर्वी, ही मर्यादा फक्त ₹१ लाख (अंदाजे $१००,००० USD) होती. यामुळे व्यवसायांना आणि मोठ्या खरेदी करणाऱ्यांना फायदा होईल.
advertisement
7/8
UPI ऑटो-पे सेवा- मोबाइल रिचार्ज, वीज आणि पाण्याचे बिल किंवा सबस्क्रिप्शनसाठी आता UPI वर ऑटो-पे उपलब्ध असेल. प्रत्येक वेळी पेमेंट कापल्यावर तुम्हाला एक सूचना देखील मिळेल.
advertisement
8/8
UPI कलेक्ट रिक्वेस्ट बंद- तुम्ही आता UPI अॅपवर कोणाकडूनही थेट पैसे मागू शकणार नाही. फसवणूक रोखण्यासाठी NPCI ने हे फीचर बंद केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
UPI payment rule change: पेमेंट करायचं नो टेन्शन! ऑटो पे पासून ते लिमिटपर्यंत UPI ने बदलले नियम