TRENDING:

मध्य रेल्वेने रोज प्रवास करताय सावधान! मोबाईल चोरणारी फटका गँग पुन्हा सक्रिय, 'हे' तीन स्टेशन टार्गेटवर

Last Updated:
मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बाजारामध्ये, रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यावरही चालता चालता मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. खरंतर गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना आपण घडताना पाहतो. आता अशातच मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये शहरांमध्ये दिवसेंदिवस प्रमाण वाढताना दिसत आहे.
advertisement
1/7
रोज रेल्वेने प्रवास करताय? मोबाईल चोरणाऱ्या फटका गँगच्या 'हे' स्टेशन टार्गेटवर
मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बाजारामध्ये, रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यावरही चालता चालता मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. खरंतर गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना आपण घडताना पाहतो. आता अशातच मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये शहरांमध्ये दिवसेंदिवस प्रमाण वाढताना दिसत आहे.
advertisement
2/7
दुचाकीवरील चोरट्यांकडून मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानकांवरही गर्दीचा फायदा घेत अनेकदा चोरटे मोबाईल हिसकवतात. फक्त रस्त्यावरच नाही तर, आता रेल्वेमध्येही मोबाइल हिसकविण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
advertisement
3/7
मुंबई आणि उपनगरीय प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारतायत. दररोज 5 ते 6 मोबाईल चोरीच्या घटना घडत असताना मात्र एका उपनगरीय रेल्वे स्थानकावर एकाच दिवशी तब्बल 17 घटनांची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
4/7
मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीच्या प्रकरणात वाढ होत आहे. चोरट्यांनी दिवसाढवळ्या एका दिवसात या स्थानकांतून तब्बल 17 मोबाईलची चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
advertisement
5/7
दरदिवशीच्या तुलनेत, 29 ऑक्टोबर रोजी, तब्बल 17 मोबाईल चोरींचे गुन्हे दाखल झाल्याने प्रवासी संताप झाले. एकाच दिवसात रेल्वे पोलिसांत इतके गुन्हे दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया मिळत आहे. नियमित मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश का होत नाही? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
advertisement
6/7
ठाणे रेल्वे स्थानक अति गर्दीचा झोन असला तरीही प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे यंत्रणा उपलब्ध असतात. चोरी प्रवाश्यांच्या बेजबाबदारपणामुळे झाली असली तरीही संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे मोबाईल चोरांना वाव भेटतो, असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.
advertisement
7/7
मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकावर दिवसाला हजारो प्रवासी कामानिमित्त प्रवास करत असतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांच्या आवश्यक वस्तूंची नियमित चोरी होणे, ही घटना काही नवीन नाही. परंतू दिवसाला इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत असेल पोलीस ॲक्शनमोडवर येणं गरजेचं आहे. रेल्वे पोलिस या चोरट्यांवर केव्हा ॲक्शन घेणार पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मध्य रेल्वेने रोज प्रवास करताय सावधान! मोबाईल चोरणारी फटका गँग पुन्हा सक्रिय, 'हे' तीन स्टेशन टार्गेटवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल