TRENDING:

Mumbai Local: मध्य रेल्वेवर पुन्हा मृत्यूतांडव, लोकल स्टेशनवर एका प्रवाशाचा मृत्यू, 'सँडहर्स्ट रोड'वर काय घडलं?

Last Updated:
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक आणि मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
advertisement
1/8
पुन्हा मृत्यूतांडव, लोकल स्टेशनवर 1 प्रवाशाचा मृत्यू, ''सँडहर्स्ट'वर काय घडलं?
मुंबईत ऐन संध्याकाळच्या वेळी मोटरमन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे एका प्रवाशाचा हाकनाक जीव गेला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे सगळ्याच स्थानकांवर गर्दी झाली होती. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर लोकलने धडक दिल्यामुळे १ प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी असून त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
2/8
ऐन संध्याकाळी जेव्हा चाकरमानी आपल्याकडे घराकडे निघतात त्याचवेळीची संधी साधून रेल्वे कर्मचारी आणि मोटरमनने मुंबई मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं.
advertisement
3/8
मुंब्रा  येथील झालेल्या अपघातामुळे इंटरनल इन्क्वायरी मध्ये दोन इंजिनियर यांच्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्यामुळे युनियनने हे आंदोलन केलं होतं.  त्यामुळे एकही लोकल सुटली नाही. दोन तासांच्या आंदोलनानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. पण या दोन तासांमध्ये मध्य रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.
advertisement
4/8
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादरसह सर्वच रेल्वे स्थानक चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक स्टेशनवर पाय ठेवायलाही जागा नव्हती.
advertisement
5/8
मुंबईतील 'सँडहर्स्ट रोड स्थानकावर धावत्या लोकलने ४ प्रवाशांना धडक दिली. या अपघातात १ प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमी प्रवाशांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय.
advertisement
6/8
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक आणि मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. खूप जास्त गर्दी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
7/8
धक्कादायक म्हणजे, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ऐन संध्याकाळी हे आंदोलन केलं होतं. संध्याकाळची वेळही मध्य रेल्वेवर नेहमी गर्दीची असते. संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते.
advertisement
8/8
पण, तरीही रेल्वे कर्मचाऱ्यांनी एका शुल्लक मागणीसाठी मुंबईकरांना वेठीस धरलं. या आंदोलनामुळे प्रवाशांचा मृत्यू झालं आहे. हे आंदोलन मुंबईकरांच्या जीवावर बेतलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Local: मध्य रेल्वेवर पुन्हा मृत्यूतांडव, लोकल स्टेशनवर एका प्रवाशाचा मृत्यू, 'सँडहर्स्ट रोड'वर काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल