Atal Setu Toll-Free : अटल सेतूवर प्रवाशांना मोठी लॉटरी; 'या' गाड्यांना तर एक रुपयाही भरावा लागणार नाही टोल
Last Updated:
Atal Setu Toll-Free : महाराष्ट्र सरकारने अटल सेतूवर टोलसाठी 50% सवलत कायम ठेवली आहे. इलेक्ट्रिक मोटार कार आणि बसेससाठी पूर्णपणे टोलमुक्त प्रवास लागू झाला आहे.
advertisement
1/6

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूचा वापर करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
advertisement
2/6
अटल सेतूवर आकारल्या जाणाऱ्या टोलमध्ये दिली जाणारी 50 टक्के सवलत पुढील आणखी एक वर्ष कायम ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
advertisement
3/6
एवढेच नाही तर इलेक्ट्रिक मोटार कार आणि इलेक्ट्रिक बस यांना अटल सेतूच्या टोलमधून पूर्ण सूट देण्याचा निर्णयही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
advertisement
4/6
राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी 4 जानेवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीत अटल सेतूच्या टोलमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच निर्णयाच्या पुढील अंमलबजावणीअंतर्गत आता 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीसाठी ही सवलत लागू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
advertisement
5/6
सरकारने विविध प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे टोल दरही निश्चित केले आहेत. मोटार, जीप, व्हॅन आणि हलक्या मोटार वाहनांसाठी 250 रुपये, 200 रुपये आणि 50 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे. हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन आणि मिनी बससाठी 400 रुपये, 320 रुपये आणि 80 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
6/6
दोन आसांच्या ट्रक अथवा बससाठी 830 रुपये, 655 रुपये आणि 170 रुपये टोल आकारला जाणार आहे. तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी 905 रुपये, 715 रुपये आणि 185 रुपये असा दर ठरवण्यात आला आहे. तसेच अवजड बांधकाम आणि जमीन खोदाई यंत्रसामग्रीसाठी 1300 रुपये, 1030 रुपये आणि 270 रुपये तर अति अवजड आणि सात किंवा त्याहून अधिक आसांच्या वाहनांसाठी 1500 रुपये, 1255 रुपये आणि 325 रुपये इतका टोल आकारण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Atal Setu Toll-Free : अटल सेतूवर प्रवाशांना मोठी लॉटरी; 'या' गाड्यांना तर एक रुपयाही भरावा लागणार नाही टोल