Mumbai Local Megablock: रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाहाल, 'या' स्थानकांवर थांबे बंद राहणार
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
रविवारी सुट्टी असल्याने जर तुम्ही लोकलने प्रवास करत बाहेर जाण्याचा विचार करताय तर थांबा, ही बातमी नक्की वाचा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
advertisement
1/5

2/5
दर आठवड्याला घेण्यात येणाऱ्या ह्या ब्लॉकच्या काळात मुंबईतील काही स्थानकांवरील लोकल गाड्यांचा थांबा रद्द करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नेमक्या कोणकोणत्या स्थानकांवर लोकल थांबणार नाही, जाणून घेऊया
advertisement
3/5
त्यामुळे जर तुम्हाला या रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवास करायचा असेल, तर तुम्ही पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि नेरुळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
advertisement
4/5
ठाणे ते वाशी आणि नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे. या मार्गावरील काही लोकल सेवा रद्द किंवा उशिराने धावण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळे मोठा परिणाम होणार आहे.
advertisement
5/5
प्रवाशांनी प्रवासापूर्वी लोकल वेळापत्रक तपासावे आणि आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Local Megablock: रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाहाल, 'या' स्थानकांवर थांबे बंद राहणार