Ac Local Train : हार्बर मार्गावर एसी लोकलचे काउंटडाउन सुरू; पाहा कोणत्या वेळेत सुटणार नवीन ट्रेन
Last Updated:
AC Local Timetable : 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल पुन्हा सुरू होत असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलच्या 12 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
advertisement
1/7

हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी,वडाळा रोड ते पनवेल या मार्गावर 14 एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत. मात्र या एसी लोकलसाठी काही सामान्य लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने नियमित प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
याआधी 1 डिसेंबर 2021 रोजी हार्बर मार्गावर पहिल्यांदा एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट आणि पासचे दर जास्त असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर हार्बर मार्गावरील एसी लोकल पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.
advertisement
3/7
आता नव्या नियोजनानुसार पुन्हा एसी लोकल सुरू करण्यात येत आहेत. यासाठी गर्दीच्या वेळेतील तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
advertisement
4/7
यात सकाळी 9.09 पनवेल-सीएसएमटी, संध्याकाळी 5.30 वडाळा रोड-पनवेल आणि रात्री 8 वाजताची सीएसएमटी-पनवेल या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. या वेळेत एसी लोकल धावणार आहेत.
advertisement
5/7
या सर्वांमध्ये पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनेही 26 जानेवारीपासून 12 अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
6/7
सध्या पश्चिम रेल्वेवर 109 एसी लोकल फेऱ्या धावत असून आता हा आकडा 121 फेऱ्यांपर्यंत वाढणार आहे. या 12 नव्या फेऱ्यांपैकी 6 अप मार्गावर आणि 6 डाऊन मार्गावर असतील. यामध्ये 4 सकाळच्या गर्दीच्या वेळेत तर 8 संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत धावतील.
advertisement
7/7
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे काही प्रवाशांना एसी लोकलचा आरामदायी प्रवास मिळणार असला तरी सामान्य लोकल कमी झाल्याने दैनंदिन प्रवाशांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Ac Local Train : हार्बर मार्गावर एसी लोकलचे काउंटडाउन सुरू; पाहा कोणत्या वेळेत सुटणार नवीन ट्रेन