TRENDING:

शेतकऱ्याचा मुलगा ठरला Bigg Boss Kannada 12 चा विजेता, कॉमेडियन गिली नाटाने चमकत्या ट्रॉफीसोबत जिंकली इतकी रक्कम

Last Updated:
Bigg Boss Kannada 12 Winner : 'बिग बॉस कन्नड 12'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. कॉमेडियन गिली नाटा या सीझनचा विजेता ठरला आहे.
advertisement
1/7
शेतकऱ्याचा मुलगा ठरला Bigg Boss Kannada 12 चा विजेता!
'बिग बॉस कन्नड 12'चा दिमाखदार ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. कॉमेडियन गिली नाटा या सीझनचा विजेता ठरला आहे. या सीझनची चमकती ट्रॉफी गिली नाटाने आपल्या नावावर केली असून त्याला 50 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस कन्नड 12' चा विजेता गिली नाटा हा एक लोकप्रिय कॉमेडियन आहे. ग्रँड फिनालेमध्ये त्याला रक्षिता शेट्टी सोबत सामना करावा लागला होता. दरम्यान सुपरस्टार किच्चा सुदीप यांनी गिलीचा हात उचलत त्याला या सीझनचा विजेता घोषित केला.
advertisement
3/7
'बिग बॉस कन्नड 12'चा फिनाले 18 जानेवारी 2026 रोजी प्रसारित झाला आणि गिलीने 50 लाख रुपयांची मोठी बक्षीस रक्कम जिंकण्यासोबतच एक नवीन मारुती सुझुकी विक्टोरिस कारही जिंकली. दुसरीकडे, रक्षिता शेट्टी या शोची फर्स्ट रनर-अप ठरली.
advertisement
4/7
'बिग बॉस कन्नड 12'मध्ये धनुष गौडा सहाव्या स्थानावर, म्युटंट रघु पाचव्या स्थानावर, तर काव्या चौथ्या स्थानावर एलिमिनेट झाले. फक्त गिली आणि रक्षिता हे टॉप दुसऱ्या स्थानावर होते आणि त्यांना 50 लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली.
advertisement
5/7
गिली नाटा हा कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मालवल्ली तालुक्यातील मटाडापुरा येथील रहिवासी आहे. हा कॉमेडियन एका शेतकरी कुटुंबातून आला असून त्याचं आयुष्य साधं पण संघर्षाने भरलेलं होतं.
advertisement
6/7
गिलीने आपले शिक्षण स्थानिक पातळीवर पूर्ण केले आणि त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार त्याने ITI चे शिक्षण घेतले. गिली एका छोट्या शहरातून आलेला असून सिने दिग्दर्शक होण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक अडचणी आणि संधींच्या अभावामुळे त्याला मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना खूप संघर्ष करावा लागला. बिग बॉस कन्नड सीझन 12 मधील तो सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक ठरला.
advertisement
7/7
गिलीने नेहमी रोजच्या आयुष्यातील घटकांवर कंटेंट बनवायला प्राधान्य देतो. कॉमेडीच्या माध्यमातूनच त्याला ओळख मिळाली. विशेष म्हणजे गिलीचे खरे नाव नटराज आहे. 'बिग बॉस कन्नड 12' आधी तो ‘डान्स कर्नाटक डान्स’ आणि ‘कॉमेडी किलाडिगालु’ सीझन 4 मध्येही झळकला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शेतकऱ्याचा मुलगा ठरला Bigg Boss Kannada 12 चा विजेता, कॉमेडियन गिली नाटाने चमकत्या ट्रॉफीसोबत जिंकली इतकी रक्कम
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल