INT 2025 Results:'मढं निघालय अनुदानाला'! ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजने दिली आयएनटीला मात, PHOTOS
- Published by:Chetan Bodke
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
मुंबई, ठाणे परिसरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपल्या अभिनयकौशल्याची, दिग्दर्शनाची आणि कलात्मकतेची झेप दाखवली.
advertisement
1/5

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तरुण रंगकर्मींचा सळसळता उत्साह, खचाखच भरलेलं नाट्यगृह, दिवसभर सादर होणाऱ्या एकांकिका आणि प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट असा माहोल आयएनटी या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अनुभवायला मिळाला. यंदा या स्पर्धेचं सुवर्णमहोत्सवी, म्हणजेच 50 वे वर्ष, साजरं झालं. 15 सप्टेंबर 2025 रोजी चर्चगेटजवळील यशवंतराव नाईक नाट्यगृहात अंतिम फेरी पार पडली. मुंबई, ठाणे परिसरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपल्या अभिनयकौशल्याची, दिग्दर्शनाची आणि कलात्मकतेची झेप दाखवली.
advertisement
2/5
यावर्षीच्या स्पर्धेसाठी नाट्यसृष्टीतील मान्यवर श्वेता पेंडसे, भालचंद्र कुबल आणि राजन ताम्हाणे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिग्दर्शन मिळालं. सामाजिक प्रश्न, पर्यावरण, नातेसंबंध, मानसिक संघर्ष अशा अनेक विषयांवर एकांकिका रंगमंचावर सादर झाल्या आणि प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
advertisement
3/5
यावर्षीच्या आयएनटी स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ठाण्याच्या जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाला मिळाले. त्यांच्या मढ निघालय अनुदानाला या एकांकिकेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले. लाईव्ह म्युझिक, देखणे नेपथ्य, उत्कृष्ट संगीत आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनय यामुळे ही एकांकिका प्रथम क्रमांकावर झळकली.
advertisement
4/5
विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाने सादर केलेली अमिगडाला ही एकांकिका द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली. अनेक वर्षांनंतर या महाविद्यालयाने आयएनटीत पारितोषिक पटकावल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. या एकांकिकेतील कथानक, कलाकारांचा अभिनय आणि रंगमंचीय सादरीकरणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
5/5
ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधनालय महाविद्यालयाने सादर केलेली थीमक्का ही एकांकिका तिसऱ्या क्रमांकावर निवडली गेली. कर्नाटकातील पर्यावरणवादी सालूमर्दा थिम्माक्का, ज्यांना वृक्ष माता म्हणून ओळखले जाते, त्यांच्या कार्यावर आधारित ही एकांकिका होती. थिम्माक्का आणि त्यांच्या पतीने मिळून 8 हजारांहून अधिक झाडे लावली व संगोपन केले, या प्रेरणादायी विषयाला विद्यार्थ्यांनी रंगमंचावर प्रभावी रूप दिले. उत्तम नेपथ्य, सजीव संगीत आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे या एकांकिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
INT 2025 Results:'मढं निघालय अनुदानाला'! ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजने दिली आयएनटीला मात, PHOTOS