सासऱ्यांनी प्रॉपर्टीमधून हाकललं, नणंदांनी कोर्टात खेचलं; वर्षा उसगांवकरांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी Controversy
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Varsha Usgaonkar Controversy : मराठी चित्रपटसृष्टीची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी वर्षा उसगांवकर एकेकाळी तिच्या अभिनयासाठी खूप लोकप्रिय होती. पण, तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वाद होते.
advertisement
1/6

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी वर्षा उसगावकर एकेकाळी तिच्या अभिनयासाठी खूप लोकप्रिय होती. पण, तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वाद होते. काही रिपोर्ट्सनुसार, तिच्या सासऱ्यांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला त्यांच्या संपत्तीमधून बेदखल केलं होतं.
advertisement
2/6
वर्षा उसगावकरने प्रसिद्ध संगीतकार रवीशंकर शर्मा यांचा मुलगा अजय शर्मा यांच्याशी लग्न केलं. पण, लग्नानंतर काही काळानंतरच त्यांचे सासरे रवीशंकर यांनी एका मुलाखतीत एक धक्कादायक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, “वर्षा आणि अजय हे दोघे माझा छळ करतात.” त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ माजली होती.
advertisement
3/6
यानंतर रवीशंकर यांनी त्या दोघांना आपल्या संपत्तीमधून बेदखल केलं. इतकंच नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर वर्षा आणि अजयने अग्नी देऊ नये, अशीही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती.
advertisement
4/6
२०१२ मध्ये रवीशंकर शर्मा यांचं निधन झालं. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांचं पार्थिव शरीर त्यांच्या मुलींकडे म्हणजेच वर्षाच्या नणंदांकडे सोपवण्यात आलं. पण, सासऱ्यांच्या मृत्यूनंतर एक नवा वाद सुरू झाला.
advertisement
5/6
वर्षाच्या नणंदांनी तिच्यावर मुंबईतील घर हडपल्याचा आरोप केला. त्यांनी थेट कोर्टात केस दाखल केली. त्या म्हणाल्या की, “हे घर आमच्या वडिलांचं आहे आणि आमचा त्यावर हक्क आहे, पण वर्षा आणि अजयने ते हडपलं आहे.”
advertisement
6/6
या प्रकरणात कोर्टाने तो बंगला चौघांमध्ये वाटून दिला. या वादामुळे वर्षाच्या लोकप्रियतेवरही परिणाम झाला. आजही याबद्दल ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, वर्षा उसगावकर शेवटच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत दिसल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सासऱ्यांनी प्रॉपर्टीमधून हाकललं, नणंदांनी कोर्टात खेचलं; वर्षा उसगांवकरांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी Controversy