Konkan : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही विघ्न, प्रचंड गर्दी; एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न, पाहा PHOTO
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
चंद्रकांत बनकर, खेड, 24 सप्टेंबर : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही म्हणून रेल्वे मधील आणि प्लॅटफॉर्म मधील प्रवाशांमध्ये काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली.
advertisement
1/6

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून जात आहेत.
advertisement
2/6
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही म्हणून रेल्वे मधील आणि प्लॅटफॉर्म मधील प्रवाशांमध्ये काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली.
advertisement
3/6
आधीच्या स्थानकातून रेल्वे गाड्या खचाखच भरून आल्याने तसेच आत मधून दरवाजे बंद केल्याने खेड स्थानकातील प्रवाशांना आत मध्ये शिरता येत नसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
4/6
मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्सप्रेस चा इंजिन समोर उभा राहून काही संतप्त प्रवाशांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
5/6
गर्दीमध्ये एक युवक अक्षरशः गुदमरल्याने त्याच्यावर स्थानकच प्रथमोपचार करण्यात आले.
advertisement
6/6
आरपीएफ आणि रत्नागिरी पोलीस यांच्यामुळे कोणताही अनर्थ झाला नाही मात्र रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Konkan : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही विघ्न, प्रचंड गर्दी; एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न, पाहा PHOTO