मुंबईत मनासारखी थंडी नाहीच, कोकणात पुन्हा पाऊस? IMD कडून मोठा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
राज्यातील वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणातील काही जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/6

मुंबई आणि कोकणात किमान आणि कमाल तापमानात कोणतीही घट दिसत नाहीये. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.
advertisement
2/6
हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा सध्या मुंबईकर उन, पाऊस आणि थंडी असा एकत्रीत वातावरणाचा अनुभव घेत आहेत. नोव्हेंबर महिन्याचे अगदी आता काही दिवस उरलेले असताना सुद्धा मुंबईकर अजूनही थंडीच्या प्रतीक्षेतच आहेत.
advertisement
3/6
मुंबई आणि जवळच्या उपनगरांत दिवसभर निरभ्र आकाश राहील. सकाळी काही प्रमाणात थंडी आणि धुके जाणवेल परंतु संपूर्ण दिवस मात्र घामाच्या धारा लागण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
मुंबईत काही दिवस सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत होता. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तोदेखील नाहीसा झाला आहे.
advertisement
5/6
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सिअस आणि 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रता पातळी 47 टक्के असेल.
advertisement
6/6
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.