Mumbai Rain: श्रावणाच्या शेवटी वारं फिरलं, कोकणात पावसाचा जोर ओसरला, मुंबई-ठाण्याचा हवामान अंदाज
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात गेल्या चार दिवसांत पावसानं थैमान घातलं. आता श्रावणाच्या शेवटी हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत.
advertisement
1/5

गेल्या अनेक दिवसांपासून कोकण पट्ट्यात व मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचणे, निचऱ्याची गती कमी होणे आणि वाहतुकीला अडथळे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हवामानाचा बदललेला चेहरा नागरिकांसाठी दिलासा ठरत आहे.
advertisement
2/5
मुंबई शहर व उपनगरांमध्ये 22 ऑगस्ट रोजी कोणताही हवामान अलर्ट जारी केलेला नाही. सकाळपासून रिमझिम पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून पडल्या असल्या तरी मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू असून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हवेत गारवा जाणवत असून वातावरण सुखद झाले आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातसुद्धा पावसाने आळा घातला आहे. गेल्या आठवड्यात जोरदार सरींनी नागरिकांचे हाल केले होते, मात्र सध्या या भागात आकाश ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. हवामान खात्याने कोणताही अलर्ट दिलेला नाही, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर मागील काही दिवसांपासून कमी झाला आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जलसाठा व वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र 22 ऑगस्ट रोजी या भागात पावसाचे प्रमाण कमी झाले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. कोणताही हवामान इशारा नसल्याने दैनंदिन जीवन सुरळीत सुरू आहे.
advertisement
5/5
रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज कोणताही धोका नाही. हवामान स्थिर असून हलक्या सरी पडत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: श्रावणाच्या शेवटी वारं फिरलं, कोकणात पावसाचा जोर ओसरला, मुंबई-ठाण्याचा हवामान अंदाज