Weather Alert: कोकणात वारं फिरलं, बाप्पाच्या आगमनाआधीच पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यासह 6 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: गणपती आगमनाच्या आधीच कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील काही दिवस मुंबईसह कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

गणपती बाप्पाच्या आगमनाला आता फक्त एक दिवस उरला आहे. बुधवारी, 27 ऑगस्टला बाप्पाचे स्वागत करण्यासाठी राज्यभरात तयारी जोरात सुरू आहे. मात्र त्याआधीच, 26 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीच्या स्वागताच्या तयारीत हवामानाचा अडथळा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
2/5
सोमवारपासून मुंबई आणि मुंबई उपनगर भागात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईसाठी आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपार आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. शहरातील सखल भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी विशेष सतर्कता बाळगावी.
advertisement
3/5
मुंबईप्रमाणेच नवी मुंबई व ठाणे या दोन्ही शहरांसाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील. नवी मुंबईतील खाड्यालगतच्या भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात या आठवड्याची सुरुवातच जोरदार पावसाने झाली आहे. त्यामुळे आज पालघर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे निर्देश कायम आहेत.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन कोकण जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार सरींचा अंदाज असून, काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, परंतु काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात वारं फिरलं, बाप्पाच्या आगमनाआधीच पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यासह 6 जिल्ह्यांना अलर्ट