TRENDING:

Weather Alert: कोकणात वारं फिरलं, ठाणे-नवी मुंबईत धो धो कोसळणार, 48 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रासह कोकणातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आज नवी मुंबई, ठाण्यासह काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5
कोकणात वारं फिरलं, ठाणे-नवी मुंबईत धो धो कोसळणार, 48 तासांसाठी अलर्ट
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान स्थिर होते, मात्र आज काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत दिवसभर अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना दिलेल्या यलो अलर्टमुळे मुंबईतही हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण असून दुपारनंतर रिमझिम पावसाची शक्यता आहे. तापमान आज 26 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग सुमारे 10 ते 12 किमी प्रतितास असेल. दमट हवेमुळे शहरात उकाडा जाणवेल.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईत आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागात मुसळधार सरी पडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग 15 किमी प्रतितास इतका असेल.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यातही आज यलो अलर्ट असल्यामुळे पावसाची शक्यता अधिक आहे. सकाळपासून वातावरण दमट असून काही भागात रिमझिम सरी सुरू झाल्या आहेत. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. आज तापमान 24 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग 10 ते 14 किमी प्रतितास इतका असेल.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गया तीनही जिल्ह्यांमध्ये आज पावसाला विश्रांती आहे. गेल्या आठवड्यापासून अधूनमधून हलक्या सरी होत होत्या, मात्र आज वातावरण स्थिर असून पाऊस नाही. आकाशात हलके ढग राहतील पण दिवसाच्या उत्तरार्धात कोरडे हवामान राहील. तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि किनारी भागात उष्णता जाणवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात वारं फिरलं, ठाणे-नवी मुंबईत धो धो कोसळणार, 48 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल