TRENDING:

Weather Alert: मुंबई-ठाण्यात हवापालट, कोकणात पुन्हा यलो अलर्ट, रविवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: ऑगस्टअखेर मुंबई-ठाण्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणात मात्र पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/5
मुंबई-ठाण्यात हवापालट, कोकणात पुन्हा यलो अलर्ट, रविवारचा हवामान अंदाज
ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस असून पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज 31 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला कोणताही अलर्ट नसला तरी रिमझिम ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर रिमझिम पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने कोणताही अलर्ट दिलेला नसला तरी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि अधूनमधून हलक्या सरी सुरू आहेत. दुपारनंतर पावसाची तीव्रता किंचित वाढू शकते, मात्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. आजचे तापमान साधारणपणे किमान 25 अंश सेल्सियस तर कमाल 30 अंश सेल्सियस इतके राहील. वारे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे असून त्यांचा वेग 15 ते 20 किलोमीटर प्रतितास आहे. समुद्राच्या भरतीदरम्यान पाणी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात हवामान मुंबईप्रमाणेच असेल. दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी सुरू राहतील तर काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागाला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. तापमान किमान 25 अंश सेल्सियस आणि कमाल 31 अंश सेल्सियस राहील. वारे सुमारे 20 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील. वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही आणि वातावरण साधारण स्थिर राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर इतर भागात तुरळक प्रमाणात पाऊस होईल. तापमान किमान 24 अंश सेल्सियस आणि कमाल 30 अंश सेल्सियस इतके राहील. वारे अंदाजे 25 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणार असून वातावरण आर्द्र राहील. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासूनच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुरू आहेत आणि दुपारनंतर काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.या तिन्ही जिल्ह्यांत आजचे तापमान किमान 23 ते 24 अंश सेल्सियस आणि कमाल 28 ते 29 अंश सेल्सियस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग साधारण 25 ते 35 किलोमीटर प्रतितास असेल. पावसामुळे ग्रामीण भागात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: मुंबई-ठाण्यात हवापालट, कोकणात पुन्हा यलो अलर्ट, रविवारचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल