Weather Alert: रविवारी मुसळधार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट, मुंबईसह कोकणचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून संपूर्ण कोकणात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. आज सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
advertisement
1/3

ठाणे आणि नवी मुंबईलाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. येथे गेल्या काही दिवसांत फक्त हलका किंवा मध्यम पाऊस झाला होता. परंतु आज दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
2/3
पालघर जिल्ह्यात गेले काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होत होता. आज मात्र हवामान विभागाने पालघरमध्येही यलो अलर्ट दिला आहे. अनेक भागांत जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/3
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवरील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर अधिक असेल. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि येथे मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, दोन्ही जिल्ह्यांत आज अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे.
advertisement
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: रविवारी मुसळधार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट, मुंबईसह कोकणचं हवामान अपडेट