TRENDING:

Weather Alert: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धो धो पाऊस, कोकणात अलर्ट, मुंबई-ठाण्यात काय स्थिती?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रतून पावसाने माघार घेतली असली तरी कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धो धो पाऊस, कोकणात अलर्ट, मुंबई-ठाण्यात काय स्थिती?
दिवाळीच्या तोंडावर कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळतोय. गेले काही दिवस कधी रिमझिम सरी तर कधी कडक ऊन असं अशी स्थिती होती. मात्र आता पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांमध्ये उन्हाचा कडाका वाढणार असून वातावरण पूर्णपणे कोरडं राहणार आहे. दुसरीकडे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही पावसाची शक्यता कायम आहे.
advertisement
2/5
मुंबईमध्ये सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव स्पष्ट जाणवतोय. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने वातावरण कोरडे झाले आहे. दिवसाचं तापमान वाढत असून सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवतोय. समुद्रकिनारी भागांमध्ये आर्द्रतेमुळे दमट उकाडा वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता अत्यल्प असून, पुढील काही दिवस असेच कोरडे आणि उष्ण वातावरण राहणार आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही हवामानाची परिस्थिती मुंबईसारखीच आहे. इथे सकाळपासूनच उन्हाचा पारा वाढताना दिसतोय. गेल्या आठवड्यात थोड्या हलक्या सरी पडल्यानंतर आता पावसाला ब्रेक लागला आहे. तापमान वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास होतोय. वातावरणात दमटपणा जाणवत असून, थंड वाऱ्यांचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिवसभरात उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांत हलका पाऊस झाला असला तरी आता तिथेही उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळपासूनच कोरडे आणि गरम हवामान जाणवत असून, आकाश स्वच्छ आहे. पावसाची शक्यता कमी असून, हवामान विभागाने सांगितलंय की, येत्या दोन दिवसांतही इथे उष्ण वातावरण कायम राहील.
advertisement
5/5
कोकणातील इतर भागांमध्ये मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. रायगड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी आभाळ दाटलेलं असून, अधूनमधून रिमझिम सरी पडतील. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने आजही यलो अलर्ट दिला आहे. इथे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धो धो पाऊस, कोकणात अलर्ट, मुंबई-ठाण्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल