TRENDING:

Weather Alert: कोकणात हवा बदलणार, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, IMD कडून 48 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांत विश्रांती घेतलेला पाऊस कोकणात पुन्हा सक्रीय होत आहे.
advertisement
1/5
कोकणात हवा बदलणार, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, IMD कडून 48 तासांसाठी अलर्ट
कोकण किनारपट्टीवरील हवामानाचा पॅटर्न गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. सलग दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून रिमझिम पाऊस होत आहे. आज 12 सप्टेंबर रोजी देखील हीच स्थिती कायम राहणार असून हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर 13 सप्टेंबरला मात्र हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवतील. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांचा आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत आज पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. शहरातील काही भागांत अधूनमधून रिमझिम सरी बरसतील, मात्र मोठा मुसळधार पावसाची शक्यता नाही. सकाळ-संध्याकाळी आभाळ दाटून येईल आणि वातावरण आल्हाददायक राहील. तापमान सुमारे 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, तर आर्द्रता वाढलेली असल्याने उकाडाही जाणवेल. शनिवारपासून 2 दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईतही हवामान परिस्थिती जवळपास सारखीच असेल. या भागांत हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस अधूनमधून सुरू राहील. तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर समुद्राच्या किनाऱ्याजवळ हलक्या वाऱ्याचा अनुभव मिळेल. शनिवारपासून हवामानात मोठे बदल जाणवणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागांत हवामान ढगाळ राहील, तर ग्रामीण भागांत पावसाचे प्रमाण कमी-जास्त होईल. दिवसभर वारा हलक्या स्वरूपात वाहात राहील.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांप्रमाणेच आजही पावसाची परिस्थिती मिश्र राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, तर डोंगराळ आणि किनारी भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. वातावरण दमट असेल आणि तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. 13 सप्टेंबरपासून कोकणात पाऊस परतणार असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात हवा बदलणार, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, IMD कडून 48 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल