TRENDING:

Weather Alert: दिवाळीत ढगांचे फटाके अन् खराखुरा पाऊस, मुंबईसह कोकणात हवापालट, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. ऐन दिवाळीत ढगांच्या गडगडाटासह दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/5
ढगांचे फटाके अन् खराखुरा पाऊस, मुंबईसह कोकणात हवापालट, या जिल्ह्यांना अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये चढ-उतार सुरूच आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी प्रचंड उकाडा, अशा स्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऑक्टोबर हिटमुळे दिवसभर उष्ण वातावरण आणि संध्याकाळी दमटपणा जाणवत आहे. अशातच हवामान विभागाने आज कोकण किनारपट्टीसाठी नवे अपडेट दिले असून, काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे.
advertisement
2/5
मुंबईमध्ये आज पावसाची कोणतीही शक्यता नाही. आकाश कोरडे आणि स्वच्छ राहणार असून, तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. दमट आणि उकाड्याचे वातावरण दिवसभर जाणवेल. सागरी वारे कमी असल्याने दुपारच्या सुमारास उष्णता अधिक वाढेल.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई भागातही आज कोरडे हवामान राहणार आहे. काही ठिकाणी सकाळी थोडेसे ढगाळ वातावरण दिसू शकते, मात्र दिवसभर पाऊस होणार नाही. उकाड्यामुळे नागरिकांना दुपारी त्रास होईल आणि तापमान सुमारे 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, काही भागांमध्ये हलक्या रिमझिम सरींची शक्यता आहे. परंतु एकंदरीत पावसाचा जोर कमी राहील. दमट आणि उष्ण वातावरणामुळे नागरिकांना उकाडा जाणवेल.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही भागांमध्ये सरींचा जोर वाढू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आज तेथे जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सागरी भागांमध्ये वारेही थोडे वेगाने वाहतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: दिवाळीत ढगांचे फटाके अन् खराखुरा पाऊस, मुंबईसह कोकणात हवापालट, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल