Weather Alert: गौरी-गणपतीच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी, मुंबईत आज जोरधार, कोकणात यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/5

सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुंबई आणि कोकणासाठी जोरदार पावसाने झाली आहे. 2 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या ठिकाणी पावसाचा जोर राहील. काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामन विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज पहाटेपासूनच रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत. दुपार आणि संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहील. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियसदरम्यान राहील तर आर्द्रता 85 टक्क्यांच्या घरात असेल. समुद्रकिनाऱ्यावरील भागात लाटा उंचावण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरात हवामान ढगाळ राहणार आहे. सकाळच्या वेळेत हलक्या सरी पडतील मात्र दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. सरासरी तापमान 24 ते 29 अंश सेल्सियस असेल. वाऱ्याचा वेग 12-18 किमी प्रतितास इतका राहणार आहे. नागरिकांनी पावसामुळे होणाऱ्या वाहतुकीतील अडचणींसाठी तयार राहावे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज काही भागांत तुरळक सरी तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमान 24 ते 29 अंश सेल्सियसदरम्यान राहील. जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाचा जोर वाढलेला असून आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात विशेषतः डोंगरी भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तापमान 24 ते 28 अंश सेल्सियस आणि आर्द्रता 85 टक्के पेक्षा जास्त असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: गौरी-गणपतीच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी, मुंबईत आज जोरधार, कोकणात यलो अलर्ट