Mumbai Weather : कोकणात पावसाचा जोर कायम, मुंबईतही मुसळधार कोसळणार, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
या भागातील पावसाचा जोर किंचित कमी झाला असला तरी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आजही दिवसभर मुसळधार सरी कोसळणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
1/5

कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. काल 28 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट होता. दिवसभर मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत केलं होतं. आज 29 सप्टेंबर रोजी या भागातील पावसाचा जोर किंचित कमी झाला असला तरी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आजही दिवसभर मुसळधार सरी कोसळणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
2/5
मुंबईत काल दिवसभर पावसाने जोर धरला होता. आज सकाळपासूनही अनेक भागात जोरदार पाऊस सुरूच आहे. पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबईत सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. ठाणे आणि नवी मुंबई भागातसुद्धा मुसळधार पाऊस कायम असून दुपारनंतर पावसाचा वेग वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
3/5
पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. ग्रामीण भागासह किनारी भागांत मुसळधार पावसामुळे नाले, ओढे आणि लहान नद्या ओसंडण्याच्या स्थितीत आहेत. इथे ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणी शिरल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टनंतर जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसंच वसई विरार या भागांत देखील पाऊस जोरदार झाल्यानं रस्ते जलमय झाले आहेत.
advertisement
4/5
रायगड जिल्ह्यात काल रेड अलर्ट होता आणि दिवसभर मुसळधार पाऊस झाला. आजही ऑरेंज अलर्ट असून घाटमाथा आणि किनारी भागात मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे. काही डोंगराळ भागांत भूस्खलनाच्या घटना घडल्याने प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.
advertisement
5/5
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. येथे पावसाचा जोर कालपेक्षा किंचित कमी असला तरी मुसळधार ते मध्यम सरी सुरू आहेत. किनारी भागात समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather : कोकणात पावसाचा जोर कायम, मुंबईतही मुसळधार कोसळणार, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट