TRENDING:

Navi Mumbai Traffic : नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील वाहतूक 1 वर्षासाठी बंद राहणार, जाणून घ्या पर्यायी मार्ग?

Last Updated:
Kharghar Turbhe LinkRoad : खारघर-तुर्भे लिंक रोडच्या बोगदा प्रकल्पामुळे नवी मुंबईत मोठे वाहतूक बदल लागू झाले आहेत. एकेरी वाहतूक, काही रस्ते बंद आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहेत.
advertisement
1/7
नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील वाहतूक 1 वर्षासाठी बंद राहणार
खारघर–तुर्भे लिंक रोडच्या भुयारी बोगद्याच्या प्रकल्पामुळे नवी मुंबईत मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊयात हे बदल कधी पासून आणि याचे पर्यायी मार्ग कसे असतील.
advertisement
2/7
सिडकोच्या वतीने 1.763 किमी लांबीच्या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असून हे बदल 20 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. हे वाहतूक बदल साधारण एक वर्ष कायम राहणार आहेत. शीव–पनवेल महामार्गावरील शिरवणे पुलाच्या 100 मीटर आधीपासून बांधकाम सुरू झाल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त काकडे यांनी दिली आहे.
advertisement
3/7
शीव–पनवेल महामार्गाच्या पुणे कॅरेजवेवर सावन नॉलेज पार्क कंपनीपासून शिरवणे एमआयडीसी, डेल्टा स्टेलर कंपनीपर्यंत एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे.
advertisement
4/7
पोलिस तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका, सरकारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी ही एकेरी वाहतूक बंधनकारक असणार आहे.
advertisement
5/7
उरण फाट्यावरून येणारी सर्व वाहने तुर्भे एमआयडीसी रस्त्याकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नेरूळहून येणाऱ्या वाहनांना अंतर्गत रस्त्यांद्वारे शीव–पनवेल महामार्गावर मार्गक्रमण करावे लागणार आहे.
advertisement
6/7
शिरवणे गावातून एमआयडीसीकडे जाणारा मार्ग बोगदा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत बंद राहील. तसेच जुईनगर स्थानक आणि नेरूळ एलपी ब्रिजकडे जाणाऱ्या वाहनांना सेवा रस्ते आणि एलपी ब्रिज सर्व्हिस रोडकडे वळवण्यात येत आहे.
advertisement
7/7
या सर्व बदलांमुळे नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करताना हे मार्ग लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि पर्यायी मार्गांचा वापर करणे यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Navi Mumbai Traffic : नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील वाहतूक 1 वर्षासाठी बंद राहणार, जाणून घ्या पर्यायी मार्ग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल