आवडच बनली व्यवसाय, 22 वर्षांचा युवा उद्योजक 400 रुपयांत देतोय 30 हजारांचा परफ्यूम
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठमोळ्या यशनं आपली आवडच आपल्या व्यवसायत उतरवली आणि आज तो एक यशस्वी उद्योजक आहे.
advertisement
1/7

सध्याच्या काळात मराठी तरुण विविध उद्योगांत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> 22 वर्षीय यश मोरे याने परफ्यूम उद्योगात एक ब्रँड सुरू केला आहे. अनेक महागड्या परफ्यूम सारखा परफ्यूम 'मायरसा' ब्रँड अगदी कमी किमतीत देतो. 30 ते 32 हजार किमतीचा डेलिना एक्सक्लुझिफ (Delina Exclusif) परफ्यूम सारखा 20 मिली परफ्यूम यश केवळ 400 रुपयांत देतोय. त्यामुळे हा युवा उद्योजक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
advertisement
2/7
यश मोरे हा ब्रँडेड परफ्यूम सारखा परफ्यूम अगदी कमी दरात देतो. डेलिना एक्सक्लुझिफ हा परफ्यूम मार्केटमध्ये 30 ते 32 हजारांना मिळतो. पण यशने याच परफ्यूम सारखा परफ्यूम तयार केला असून तो 20 मिली 400 रुपयांत तर 60 मिली 950 रुपयांत देतोय. त्यामुळे त्याच्या परफ्यूमला मोठी मागणी आहे. तसेच मायरसा ब्रँड देशभरात लोकप्रिय झाला आहे.
advertisement
3/7
वेगवेगळे परफ्यूम ऑईल, अनेक फ्रेश केमिकल तसेच वेगवेगळे फ्लेवरचे ऑईल वापरून यश परफ्यूम तयार करतो. त्याआधी परफ्यूमचं कटडाऊन परफ्यूमर्सकडून येतं. त्या परफ्यूममध्ये अनेक पद्धतीचे केमिकल, ऑईल टाकून ज्या त्या ब्रँडचा परफ्यूम तयार केला जातो.
advertisement
4/7
एकंदरीतच तो परफ्यूम डेव्हलप करून घ्यावा लागतो. या सगळ्यासाठी एक वेगळी टीमही आहे ज्यांच्यासोबत यश काम करतो. म्हणजे एक परफ्यूम तयार होण्यासाठी जवळपास एक ते दीड महिन्याचा वेळ लागत असल्याचं यशनं सांगितलं.
advertisement
5/7
परफ्यूम मेकिंगच्या फिल्डमध्ये यायचं असेल तर 11 वी 12 तुम्हाला विज्ञान शाखेतून उत्तीर्ण व्हावं लागेल. 12 वी मध्ये केमिस्ट्रीमध्ये 80 च्या वर मार्क घेणं गरजेचं आहे. त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग करावं लागेल. त्यानंतर मास्टर ऑफ परफ्यूमरी आणि फ्लेवर टेक्नोलॉजीमध्ये डिग्री मिळवावी लागेल.
advertisement
6/7
शिक्षणाचा खर्च मात्र तुम्ही कोणतं कॉलजे निवडता आणि भारतात कि भारताबाहेर शिक्षण घेणार आहात? यावर अवलंबून आहे. पण हे शिक्षण झालं की तुम्ही स्वत:चं परफ्यूमचा व्यवसाय करु शकता किंवा चांगल्या कंपनीत नोकरीही करू शकता, असं यश सांगतो.
advertisement
7/7
दरम्यान, यशनं आपली आवडच आपल्या व्यवसायत उतरवली आणि आज तो एक यशस्वी उद्योजक आहे. अवघ्या 16 वर्षी उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या यशनं 22 व्या वर्षी देशभरात स्वत:ची ख्याती करून स्वत:ला सिद्ध केलंय. (मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
आवडच बनली व्यवसाय, 22 वर्षांचा युवा उद्योजक 400 रुपयांत देतोय 30 हजारांचा परफ्यूम