TRENDING:

Mumbai local Update: मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या, ऑफिसला लेटमार्क, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मेगाहाल

Last Updated:
Mumbai local Update: बदलापूर व वांगणी दरम्यान मालगाडी इंजिन बिघाडामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत, मुंबईकरांना मोठा मनस्ताप, लाखो नोकरदारांना ऑफिसला उशीर.
advertisement
1/6
Mumbai local Update:  मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या, ऑफिसला लेटमार्क
मुंबईकरांना आज सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या प्रवासात मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. बदलापूर आणि वांगणी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्यामुळे कामावर जाणाऱ्या लाखो नोकरदारांचे प्रचंड हाल झाले आहेत.
advertisement
2/6
मालगाडी ट्रॅकवर थांबल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या (अप मार्गावरील) लोकलच्या वाहतुकीवर थेट परिणाम झाला. सध्याच्या माहितीनुसार, कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल तब्बल २० मिनिटं उशिराने धावत आहेत, ज्यामुळे चाकरमान्यांना वेळेत ऑफिसला पोहोचणे कठीण झालं.
advertisement
3/6
सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलही सुमारे १० मिनिटे उशिराने धावत आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे अनेक लोकल वेगवेगळ्या स्थानकांदरम्यान थांबून राहिल्या.
advertisement
4/6
ट्रेन कधी सुरू होणार याची शाश्वती नसल्यामुळे अनेक हवालदिल झालेल्या प्रवाशांनी अखेर ट्रेनमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी नागरिक ट्रॅकवरून चालत पुढील स्थानकाकडे जातानाचे चित्र पाहायला मिळाले. रोजच्या धावपळीत हा त्रास सहन करताना प्रवाशांमध्ये संतापाचे आणि निराशेचे वातावरण आहे.
advertisement
5/6
आज शुक्रवार असल्यामुळे कर्मचारी आणि कामगार अनेक कामावर वेळेत जाऊन आपलं काम संपवून लवकर घरी किंवा बाहेर पडण्याच्या तयारीत होते, जेणेकरून त्यांना वीकेंड उत्साहात सुरू करता येईल. मात्र, रेल्वेच्या या बिघाडाने त्यांच्या सर्व प्लॅनवर पाणी फिरवले आहे.
advertisement
6/6
ऑफिसला पोहोचायला उशीर झाल्यामुळे अनेकांना 'लेट मार्क' लागणार आहे, ज्यामुळे वीकेंडच्या आनंदावर विरजण पडले आहे. मध्य रेल्वेचे अधिकारी बिघाड झालेले इंजिन बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहेत, पण पुढील काही तास लोकल सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यास लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai local Update: मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या, ऑफिसला लेटमार्क, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मेगाहाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल