Vastu Tips: घरात ईशान्य दिशेला असायलाच हव्या या 5 गोष्टी; देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर कायम राहते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi : वास्तुशास्त्राच्या सिद्धांतांमध्ये ईशान्य दिशेचा उल्लेख वारंवार पाहायला मिळतो. ही दिशा घराच्या उन्नती, सुख-शांती आणि समृद्धीशी संबंधित मानली जाते. ईशान्य दिशेचे जीवनात काय महत्त्व आहे, हे अनेकांना समजत नाही. वास्तुशास्त्रानुसार, दिशांचे संतुलन योग्य असेल तर घरात सकारात्मक वातावरण कायम राहते. विशेषतः ईशान्य कोनाला सर्वात शुभ आणि पवित्र दिशा मानले गेले आहे. ईशान्य दिशेचे महत्त्व काय असते आणि येथे कोणत्या पाच वस्तू ठेवल्यानं घरात सुख-समृद्धी आणि धनवृद्धी होते, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
1/6

 वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य कोन ही घराची उत्तर-पूर्व दिशा असते. ही दिशा देवांचे निवासस्थान मानली जाते, म्हणून याला पवित्र आणि ऊर्जेने परिपूर्ण दिशा म्हटले गेले आहे. असे मानले जाते की या दिशेत सकारात्मक शक्तींचा सर्वात जास्त प्रभाव असतो. घरात या दिशेला शुभ वस्तू ठेवल्या गेल्या तर घराची वास्तू संतुलित होतेच शिवाय कुटुंबात समृद्धी, शांती आणि सौभाग्य देखील वाढते.
advertisement
2/6
 ईशान्य दिशेला ठेवा या 5 शुभ वस्तू -1. पूजा स्थळ: घराच्या ईशान्य दिशेला देव्हारा असणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिशेला देवतांची कृपा सर्वात जास्त प्राप्त होते. दक्षिण दिशेला देव्हारा असणं अशुभ मानलं गेलं आहे.
advertisement
3/6
 2. तुळशीचे रोप: तुळशी मातेचे स्थान खूप पवित्र मानले जाते. तुळशीला ईशान्य दिशेला लावल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-शांती टिकून राहते. रोज तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील अडथळे संपुष्टात येतात.
advertisement
4/6
 3. पाण्याने भरलेला कलश: कोणत्याही धार्मिक विधी किंवा व्रतादरम्यान स्थापित केलेला कलश ईशान्य कोनात ठेवल्यास शुभ फळ मिळते. यामुळे पूजेचा प्रभाव वाढतो आणि मनोकामना लवकर पूर्ण होतात.
advertisement
5/6
 4. शंख: पूजा घरातील ईशान्य कोनात शंख ठेवणे आणि तो नियमितपणे वाजवणे शुभ मानले जाते. शंखाच्या ध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात दिव्यतेचे वातावरण टिकून राहते.
advertisement
6/6
 5. भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा फोटो: ईशान्य दिशेला धनाचे देवता भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा फोटो लावणं अत्यंत शुभ असतं. यामुळे घरात धन-धान्याची वृद्धी होते आणि आर्थिक स्थिरता टिकून राहते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात ईशान्य दिशेला असायलाच हव्या या 5 गोष्टी; देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर कायम राहते