महाविकास आघाडी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या इतर पक्षांचा उद्या मुंबईत महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाला सत्याचा मोर्चा असे नाव देण्यात आले आहे. मोर्चा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरायचं, कसं जायचं, कोणत्या मार्गाने कसं पोहचायचे? याविषयी माहिती दिली आहे.
advertisement
काय आहे सूचना?
- पूर्व उपनगरातून वाहनाने वा मध्य रेल्वेने येणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर रस्ता पार करून आराम हॉटेल (कॅपिटल सिनेमा) शेजारील रस्त्याने आझाद मैदान आणि मुंबई (बॉम्बे) जिमखाना ह्याच्यामधील पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणीही मोर्चाच्या आधी थेट व्यासपीठाकडे जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.
- स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे
- नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून येणाऱ्यांनी वरीलप्रमाणे अथवा जर फ्री वे ने आलात तर पी डिमेलो रोड ने जी.पी. ओ. जवळ उतरून चालत वरील मार्गाने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- पश्चिम उपनगरातून येणाऱ्यांनी चर्चगेट स्टेशनवर उतरावे, आयकर भवन (सरस्वती रोड, महात्मा गांधी रोड) च्या गल्लीतून मुंबई (बॉम्बे) हॉस्पिटलच्या रस्त्याने चालत फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. अथवा पुढे चर्चगेट स्टेशन समोरील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासमोरील सिग्नल का डाव्या बाजूला वळून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- पश्चिम उपनगरातून मेट्रो ने येणाऱ्यांनी हुतात्मा चौक स्टेशनवर उतरावे. तेथून फॅशन स्ट्रीट वर यावे.
- अन्य कोणत्याही स्टेशन वर उतरू नये
 advertisement    
 advertisement    
कोणत्या मार्गाने कसं जायचं?
दक्षिण वा मध्य मुंबईतून जे कोस्टल रोडने येणार नाहीत त्यांनी आपली वाहने गिरगाव चौपाटीला डाव्या बाजूस वळवून अथवा महालक्ष्मी मंदिर, जसलोक हॉस्पिटलमार्गे, ऑपेरा हाऊस थिएटर शेजारून, सैफी हॉस्पिटल, महर्षी कर्वे रोडने आयकर भवन येथे उतरून अथवा चर्चगेट स्टेशन येथे सिग्नलला डाव्या बाजूस वळून हुतात्मा चौकात उतरून फॅशन स्ट्रीटवर यावे.
 advertisement    
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सत्याच्या मोर्चासाठी जाताय! नक्की कुठे, कसं आणि कोणत्या स्टेशनवर जायचं? A टू Z माहिती






