Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, कुख्यात टोळीसोबत कनेक्शन! कुस्ती क्षेत्रात खळबळ

Last Updated:

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील कुख्यात टोळीशी सिकंदर शेखचे संबंध असल्याचं उघड झालं आहे.

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, कुख्यात टोळीसोबत कनेक्शन! कुस्ती क्षेत्रात खळबळ
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, कुख्यात टोळीसोबत कनेक्शन! कुस्ती क्षेत्रात खळबळ
प्रशांत बाग, प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील कुख्यात टोळीशी सिकंदर शेखचे संबंध असल्याचं उघड झालं आहे, त्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. सिकंदर हा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक केली आहे. तपासामध्ये राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदर शेख याचे संबंध असल्याचं उघड झालं आहे.
advertisement
सिकंदर शेख हा कोल्हापुरातील गंगावेश तालमीत सराव केलेला नामांकित कुस्तीपटू आहे. तसंच तो महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, ज्यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे.
दरम्यान सिकंदरच्या कुटुंबाने या प्रकरणाबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. तसंच आमच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. 2023 साली पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलमध्ये पंचांच्या निर्णयाने वाद झाला होता. या वादानंतर सिकंदर शेख महाराष्ट्रभर चर्चेत आला. यानंतर 2024 साली सिकंदरने महाराष्ट्र केसरी जिंकून मानाची गदा पटकावली होती.
advertisement

कोण आहे सिकंदर शेख?

सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा कुस्तीपटू आहे, ज्याने कुस्तीच्या जगात विशेष स्थान निर्माण केलं. हमालाचा मुलगा असलेल्या सिकंदर शेखने 2024 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून इतिहास रचला. तसंच त्याने 2024 मध्ये "रुस्तम-ए-हिंद" किताब जिंकला. सिकंदरच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा आहे आणि त्याचे वडील आणि आजोबा देखील कुस्तीपटू होते. काहीच काळापूर्वी सिकंदरने 2026 मध्ये होणाऱ्या एशियन गेममध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, कुख्यात टोळीसोबत कनेक्शन! कुस्ती क्षेत्रात खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement