Asia Cup : दोन दिवसात मुंबईत येणार आशिया कपची ट्रॉफी, नक्वीने अडवलं तर... BCCI चा प्लान B तयार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपची ट्रॉफी येत्या एक ते दोन दिवसात मुंबईमध्ये मुख्यालयात पोहोचेल, अशी अपेक्षा बीसीसीआयने व्यक्त केली आहे.
मुंबई : आशिया कपची ट्रॉफी येत्या एक ते दोन दिवसात मुंबईमध्ये मुख्यालयात पोहोचेल, अशी अपेक्षा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. पण ट्रॉफी भारतात आली नाही, तर बीसीसीआय 4 नोव्हेंबरला आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहे.
दुबईमध्ये झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला होता, पण टीम इंडियाने आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे आणि पीसीबीचे अध्यक्ष तसंच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी याच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. दोन्ही देशांमधील वादामुळे टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करायलाही नकार दिला. यानंतर नक्वी दुबईच्या मैदानातून ट्रॉफी घेऊन निघून गेला. तसंच टीम इंडियाला आपणच ट्रॉफी देणार यावर नक्वी अडून राहिला.
advertisement
बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांनी पीटीआय व्हिडिओला मुलाखत दिली आहे. 'एक महिना उलटूनही ट्रॉफी ज्या पद्धतीने आम्हाला देण्यात आली नाही त्याबद्दल आम्ही नाराज आहोत. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत. आम्ही 10 दिवसांपूर्वी एसीसी अध्यक्षांना पत्र लिहिले होते, पण त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. ट्रॉफी अजूनही त्यांच्याकडे आहे, पण आम्हाला आशा आहे की ट्रॉफी एक-दोन दिवसांत मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात आमच्यापर्यंत पोहोचेल', असं देवजीत सैकिया म्हणाले आहेत.
advertisement
4 नोव्हेंबरपासून पाकिस्तानची उलटी गिनती
जर ट्रॉफी लवकर परत दिली नाही, तर बीसीसीआय 4 नोव्हेंबरपासून दुबईमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या तिमाही बैठकीत हा मुद्दा उपस्थित करेल. बीसीसीआयने अधिकृतपणे ट्रॉफी परत करण्याची विनंती केली आहे. पण नक्वी ठाम असल्यामुळे कोणताही औपचारिक तोडगा निघालेला नाही, असं सैकिया म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 11:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : दोन दिवसात मुंबईत येणार आशिया कपची ट्रॉफी, नक्वीने अडवलं तर... BCCI चा प्लान B तयार!


