संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला फोन, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Prachi Amale
- Reported by:Tushar Rupanwar
Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून बोलून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या नेते टोकाची विरोधी भूमिका घेताना दिसून येतात. राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप करत असून खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसून येतात. मात्र आज राजकारण बाजूला सारून माणुसकी आणि राजकीय संस्कृतीचं दर्शन घडल्याचं बघायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली असून घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फोन करून विचारपूस केली आहे
शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे संजय राऊतांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करणार आहे. . खासदार संजय राऊत सध्या आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. . दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून बोलून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
advertisement
कोणी कोणी केली विचारपूस?
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. खासदार संजय राऊत यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट लिहून त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा, यासाठी प्रार्थना केली आहे.
advertisement
संजय राऊत यांना काय झालं?
सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या, असं संजय राऊत म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 9:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला फोन, नेमकं काय म्हणाले?


