Mumbai Weather Update : कोकणात थंडीचा जोर वाढला, मुंबईतही हुडहुडी, ठाण्यात काय स्थिती?
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Mumbai Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी थंडीत प्रचंड वाढ झाली आहे. कोकणातील हवामानाची स्थिती जाणून घ्या.
advertisement
1/5

राज्यात अनेक ठिकाणी थंडीत प्रचंड वाढ झाली आहे. हाड गोठवून टाकणाऱ्या या थंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे. थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत.पुढील काही दिवस राज्यातील थंडीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
मुंबईतील थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तपमानात बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
मुंबई आणि त्याचसोबत ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरांमध्ये सुध्दा तपमानात घट झाली आहे. आज संपूर्ण दिवस मुंबई आणि उपनगरांत धुक्याची तीव्रता अधिक राहील आणि दिवसभर हवामान कोरडे राहील.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 44 टक्के राहील.
advertisement
5/5
गेल्या दोन दिवसात कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मात्र पुन्हा एकदा कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण जाऊन धुके पसरायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा कोकणात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update : कोकणात थंडीचा जोर वाढला, मुंबईतही हुडहुडी, ठाण्यात काय स्थिती?