TRENDING:

Mumbai Weather Update: कोकणात वातावरणात मोठे बदल, पावसाचं संकट? हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Mumbai Weather Forecast: कोकणात ढगाळ वातावरण जरी असले तरी वातावरणात गारवा जाणवत आहे. मुंबईप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होत आहेत.
advertisement
1/5
कोकणात वातावरणात मोठे बदल, पावसाचं संकट? हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट
राज्यात पुन्हा थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता वाढत असल्याने तापमानात घट झाली आहे. किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने ही घट झाल्यामुळे गारवा वाढला आहे.
advertisement
2/5
डिसेंबर महिन्यात थंडीसाठी मुंबईकर वाट पाहत होते. आता मात्र मुंबई शहरातील तापमानात पुढील काही दिवसात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
मुंबई शहरासोबतच ठाणे, पालघर, नवी मुंबई यासारखे उपनगरांमध्ये सुद्धा किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 16 अंश सेल्सिअस आणि 33 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेचीआर्द्रता पातळी 43 टक्के असेल.
advertisement
5/5
कोकणात ढगाळ वातावरण जरी असले तरी वातावरणात गारवा जाणवत आहे. मुंबईप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होत आहेत. आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवारी कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच इथलं हवामान सतत बदलतंय. त्यामुळे आंबा, काजूचे बागायतदार चिंतेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update: कोकणात वातावरणात मोठे बदल, पावसाचं संकट? हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल