मुंबईकरांना थंडीचा अनुभव, कोकणातही गारवा वाढला, पाहा आजचं हवामान अपडेट
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील वातावरणात सध्या सातत्यानं बदल होत आहे. काही भागांत थंडी तर काही ठिकाणी अजूनही उकाडा जाणवत आहे. मुंबई आणि कोकणातील स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यातील वातावरणात सध्या सातत्यानं बदल होत आहे. काही भागांत थंडी तर काही ठिकाणी अजूनही उकाडा जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/5
मागील आठवड्यात फेंगल चक्री वादळाचा किनारापट्टीला तडाखा बसला होता. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील मोठया प्रमाणात जाणवला. चक्रीवादळामुळे मुंबईच्या तापमानात देखील वाढ झाली होती. मुंबईत तापमानाचा पार 35 ते 36 अंश सेल्सिअसवर पोहोचल होत.
advertisement
3/5
सध्या मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच पश्चिम उपनगरात मोठया प्रमाणात गारठा वाढला आहे. मुंबईकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 39 टक्के राहील.
advertisement
5/5
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचे सावट जाऊन हळूहळू थंडी परतायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात ढगाळ वातावरण नाहीस होऊन गारवा वाढला आहे. परंतु सततच्या बदलत्या तापमानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईकरांना थंडीचा अनुभव, कोकणातही गारवा वाढला, पाहा आजचं हवामान अपडेट