मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा! तापमानात घट, पाहा हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
बहुतांश ठिकाणी दिवसभर कडक ऊन आणि पहाटे थंडी असे वातावरण आहे. मुंबईत सुद्धा थंडीची चाहूल लागली आहे.
advertisement
1/5

पावसाच्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीची चाहुल लागली आहे. बहुतांश ठिकाणी दिवसभर कडक ऊन आणि पहाटे थंडी असे वातावरण आहे. मुंबईत सुद्धा थंडीची चाहूल लागली आहे.
advertisement
2/5
दिवाळीनंतर ऐन थंडीच्या काळात मुंबईकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यातच मुंबईतील आद्रतेचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे. असं असलं तरी सुद्धा पहाटे मात्र मुंबईच्या वातावरणात गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे.
advertisement
3/5
दिवाळी संपली असली तरी दिवाळीत वाजलेले फटाके आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रदुषण मुंबई शहरात आजही कायम आहे. सकाळी दाट धुक्याचा थर पाहायला मिळेल. दरम्यान, मुंबईचे हवामान सूर्यप्रकाश आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
4/5
आज मुंबईत किमान आणि कमाल तापमान 27.06 अंश सेल्सिअस ते 30.37 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि आर्द्रता 49 टक्के पर्यंत किंचित कमी होईल असा अंदाज आहे. लहान मुले आणि श्वासोच्छवासाचे आजार असलेल्या लोकांनी या वातावरणात स्वतःची काळजी घ्यावी.
advertisement
5/5
मुंबईतील किमान तापमानात दोन दिवसात काहीशी काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. कोकण विभागातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल.