TRENDING:

Weather update : उत्तर भारतात गारठा वाढला; महाराष्ट्रात आज पुन्हा पाऊस, जाणून घ्या कसं असेल वातावरण?

Last Updated:
पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी सुरू असल्यानं उत्तर भारतातील मैदानी राज्यांमध्ये गारठा वाढला आहे. मात्र दुसरीकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/5
Weather update : उत्तर भारतात गारठा वाढला; महाराष्ट्रात आज पुन्हा पाऊस
नवी दिल्ली, 8 डिसेंबर : पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी सुरू असल्यानं उत्तर भारतातील मैदानी राज्यांमध्ये गारठा वाढला आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फ पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे.
advertisement
2/5
दुसरीकडे भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज देखील महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि पूर्वी उत्तर राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मिचाँग चक्रिवादळाचा प्रभाव आता कमी झाला आहे. मात्र तरीही दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
advertisement
3/5
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये नागालँड, मणिपूर, त्रिपूरा, मेघालय आणि आसाम, महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर अरुणाचल प्रदेश, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेशच्या काही भागांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
4/5
दरम्यान महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास आज देखील महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राप्रमाणेच इतर काही राज्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे.
advertisement
5/5
चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातील आद्रर्ततेचे प्रमाण वाढणार आहे. पुढील दोन दिवस राज्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे, या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather update : उत्तर भारतात गारठा वाढला; महाराष्ट्रात आज पुन्हा पाऊस, जाणून घ्या कसं असेल वातावरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल