फक्त जाळं नाही, करंट देऊन पकडतात मासे, तोही 220 वोल्टचा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मासेमार समुद्रात जाळं टाकून मासे पकडतात, हे आपल्या सर्वांनाच माहितीये. मात्र मासेमारीच्याही काही पद्धती आहे हे आपल्याला माहितीये का? विशेषतः जंगलांशेजारी राहणारे मासेमार मासे पकडण्यासाठी खास पद्धतींचा वापर करतात. त्यापैकीच एक पद्धत आपण पाहणार आहोत.
advertisement
1/5

यात सर्वात आधी लाकडाची पातळ काठी घेऊन तिच्या सुरुवातीच्या टोकाला अॅल्युमिनियमचं आवरण लावून विजेच्या तारेला ही काठी जोडली जाते. काठीच्या मागच्या बाजूला बॅग लटकवून त्यात बॅटरी ठेवतात. सुरुवातीच्या टोकाला असलेली विजेची तार काठीवरून गोल गोल फिरवत मागच्या बॅटरीला जोडली जाते.
advertisement
2/5
माशांची चव जितकी स्वादिष्ट असते तितकेच त्यांचे आरोग्यदायी फायदेही आहेत. म्हणूनच लोक आहारात माशांचा प्रामुख्याने समावेश असतो. बाजारातील मोठ्या मागणीचा पुरवठा करता यावा म्हणून मासेमार मासे पकडण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात.
advertisement
3/5
अॅल्युमिनियमचं आवरण लावलेली काठी जिथे मासे आहेत अशी शंका असते तिथे पाण्यात टाकली जाते. या काठीमुळे साधारण 1 मीटर जागेत 220 वोल्टचा झटका लागतो. या झटक्यामुळे मासे काहीसे बेशुद्धावस्थेत जातात आणि त्यांना जाळ्यात पकडणं सहज शक्य होतं.
advertisement
4/5
या पद्धतीमुळे एक व्यक्ती अर्ध्या तासात जवळपास 5 किलो मासे पकडू शकते. तर, ही काठी तयार करण्यासाठी जवळपास 500 ते 600 रुपयांचा खर्च येतो.
advertisement
5/5
मात्र अशा पद्धतीने मासेमारी करणं वाटतंय तितकं सोपं नसतं. कारण काठीच्या मागची बॅग मासेमारांच्या पाठीवर असते. या बॅगेचं वजन 10 किलोपर्यंत असतं. पोर्टेबल इन्व्हर्टरसह हे वजन 12 किलोपर्यंत होतं.