TRENDING:

याठिकाणी गावातच भरतं न्यायालय, सरपंच बनतात न्यायाधीश, अशाप्रकारे लोकांना मिळतो न्याय!

Last Updated:
न्यायालयाचे नाव ऐकताच लोक जिल्हा किंवा तालुक्याला निघतात. मात्र, एक गाव असं आहे, ज्याठिकाणी गावातच न्यायालय भरते. विशेष म्हणजे याठिकाणी न्यायालयाप्रमाणे काम चालतं. नेमकं हे गाव कुठे आहे, यामागचा नेमका उद्देश्य काय आहे, हे जाणून घेऊयात. (नीरज कुमार, प्रतिनिधी)
advertisement
1/8
याठिकाणी गावातच भरतं न्यायालय, सरपंच बनतात न्यायाधीश, अशाप्रकारे लोकांना मिळतो..
गावातील या न्यायालयात एका खोलीत न्यायाधीशांची खुर्ची, वादी-प्रतिवादी, संपूर्ण न्यायालयात जसे वातावरण असते अगदी तसेच याठिकाणी तयार केले जाते. सरपंच न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसतात. कारकुनी कामासाठी सरपंचाला लिपिकासारखा सचिव मिळतो आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी सरकारी वकील असतात.
advertisement
2/8
याच कारणामुळे काही प्रकरणे सोडली तर लोक आता न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाणे आणि न्यायालयात जाण्याऐवजी या गावातील न्यायालयात येतात. बिहार राज्यातील बेगुसरायच्या चेरिया बरियारपूर सदर पंचायतीमध्ये असे अनोखे न्यायालय चालवले जाते.
advertisement
3/8
बेगुसराय जिल्ह्यातील चेरिया बरियारपूर सदर पंचायतीची लोकसंख्या सुमारे 10 हजार आहे. या गावात पोलीस ठाणे असूनही लोक पोलीस ठाण्यात फिरकत नाहीत. येथील सरपंच शंभू कुमार सांगतात की, त्यांच्या पंचायतीत खुनासारखे गंभीर प्रकरण वगळता इतर सर्व खटले गावच्या न्यायालयात दाखल होतात आणि याठिकाणी चालवले जातात.
advertisement
4/8
याठिकाणी न्यायाधीशाच्या भूमिकेत सरपंच असतात आणि त्यांना एक सचिवही मिळतो. कायदेशीर सल्ला देण्यासाठी वकील असतात. त्यांना न्याय मित्र म्हटले जाते.
advertisement
5/8
सरपंचने सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही पक्षकारांना नोटीस देऊन सुनावणीला उपस्थित राहण्यास सांगितले जाते. गाव न्यायालयात न्यायालयासारखी बैठकही आयोजित करण्यात आली आहे. याठिकाणी दोन्ही पक्ष आपापल्या परीने उभे राहून युक्तिवाद करतात.
advertisement
6/8
चेरिया बरियारपुर सदर पंचायतीमध्ये जेव्हा न्यायालय भरते, तेव्हा संपूर्ण सेटअप हा जिल्हा न्यायालयासारखा असतो. अनेक वेळा सरपंच रवीश कुमार, उपसरपंच, पंच यांनीही निर्णय देताना सहकार्य करतात. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत या पंचायतीतील केवळ 5 टक्के प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचतात. या ग्राम न्यायालयाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
advertisement
7/8
गावाचे माजी सरपंच शंभू शरण शर्मा यांनी सांगितले की, फौजदारी कायद्याच्या 30 पेक्षा जास्त कलमांबरोबरच काही दिवाणी कलमांवर सुनावणी करण्याचा अधिकार ग्राम न्यायालयाला देण्यात आला आहे.
advertisement
8/8
याच गावातील 60 वर्षीय नागरिक अशरफी पासवान यांनी सांगितले की, आमच्या गावातील खटले आता पोलीस ठाण्यात जात नाहीत. गावातील न्यायालयातच त्यांना न्याय मिळतो. कौटुंबिक वाद, मारामारी आणि जमिनीच्या वादाची बहुतांश प्रकरणे गावच्या न्यायालयात चालतात, अशी माहिती येथील स्थानिक देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
याठिकाणी गावातच भरतं न्यायालय, सरपंच बनतात न्यायाधीश, अशाप्रकारे लोकांना मिळतो न्याय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल