भाऊजींची आयडिया डॉ. निलेश साबळेला सुपरहिट करणार! TV, ओटीटीवर नव्हे तर कुठे दिसणार?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Nilesh Sabale : डॉ. निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' या नव्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
advertisement
1/7

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले डॉ. निलेश साबळे आता 'वहिनीसाहेब सुपरस्टार' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
advertisement
2/7
डॉ. निलेश साबळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या नव्या इनिंगबाबत माहिती दिली आहे.
advertisement
3/7
डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो... धमाल खेळ, गप्पा, कॉमेडी, संगीत, बक्षिसे आणि बरंच काही". तसेच या कार्यक्रमासाठी संपर्क साधण्यासाठी त्यांनी एक संपर्क क्रमांकदेखील शेअर केला आहे.
advertisement
4/7
डॉ. निलेश साबळे यांनी 10 वर्ष झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. त्यानंतर कलर्स मराठीवरील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरुवात केली. पण लवकरच हा कार्यक्रम बंद पडला. त्यानंतर डॉ. निलेश साबळे स्टार प्रवाहवरील एका कार्यक्रमात एका दिवसापुरतं दिसून आला.
advertisement
5/7
डॉ. निलेश साबळेंचा 'वहिनीसाहेब सुपरस्टार' आदेश बांदेकरांच्या 'होम मिनिस्टार'ला टक्कर देणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
advertisement
6/7
'वहिनीसाहेब सुपरस्टार' या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रभरातील वहिनी सकारात्मक प्रतिसाद देतील, असेही म्हटले जात आहे.
advertisement
7/7
डॉ. निलेश साबळेंच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत त्यांना आपल्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भाऊजींची आयडिया डॉ. निलेश साबळेला सुपरहिट करणार! TV, ओटीटीवर नव्हे तर कुठे दिसणार?