पुणे, 12 सप्टेंबर : शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त असते. मासिकपाळीचा त्रास, प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यास स्त्रियांच्या शरीरात रक्ताची, आयर्नची कमतरता जाणवते. त्याचा परिणाम हिमोग्लोबिनच्या पातळीवरही होतो. शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरात योग्य रक्त पुरवठा होणं गरजेचं आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी असणं ही अत्यंत धोकादायक आहे. हा धोका टाळण्यासाठी काय आहार घ्यावा याची माहिती पुण्यातल्या आहारतज्ज्ञ ज्योती भोर यांनी दिलीय.