TRENDING:

Gangster Sukha Duneke: भारतातून फरार झालेल्या आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या

Last Updated:
भारतातून पळून गेलेल्या आणखी एका गँगस्टर कॅनडातील पिनिपेग शहरात हत्या करण्यात आली आहे.
advertisement
1/6
Gangster Sukha Duneke:भारतातून फरार आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या
पंजाबमधून फरार होऊन कॅनडामध्ये जाऊन बसलेल्या A कॅटेगरीतील गुंड सुखविंदर सिंग उर्फ ​​सुक्खा दुनुके याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
advertisement
2/6
आरोपी सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग उर्फ ​​अर्श दलाचा उजवा हात होता आणि एनआयएच्या वॉन्टेड यादीत त्याचा समावेश होता. सुक्खाही कॅनडामध्ये बसून भारतातील आपल्या गुंडांच्या मार्फत खंडणीचं काम करायचा.
advertisement
3/6
सुक्खा दुनेके याच्या विरोधात सात गुन्हे दाखल असताना तो 2017 मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवून कॅनडाला गेला.. पोलिसांशी संगनमत करून त्याने कॅनडाचा व्हिसा मिळवला होता.
advertisement
4/6
पंजाब पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर त्याला मदत केल्याचा आरोप होता, त्यांना नंतर मोगा पोलिसांनी अटक केली.
advertisement
5/6
गेल्या महिन्यात कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन मुखवटाधारी बंदूकधाऱ्यांनी सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगजवळ निज्जरवर गोळ्या झाडल्या होत्या.
advertisement
6/6
त्याच्या हत्येनंतर खलिस्तानी समर्थकांनी कॅनडा, लंडन आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी निदर्शने केली आणि भारतविरोधी घोषणा दिल्या आणि निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Gangster Sukha Duneke: भारतातून फरार झालेल्या आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल