250 किमीचा वेग अन् विमानासारखा प्रवास, बुलेट ट्रेनला विसराल असा रेल्वेचा नवा प्लॅन
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत व्हर्जन ४.० ट्रेन ताशी २५० किमी वेगाने धावणार, KAVACH 5.0 सुरक्षा, ऊर्जा बचत, प्रीमियम फिचर्स, २०३० पर्यंत ८०० ट्रेनचे लक्ष्य.
advertisement
1/6

मुंबईहून अहमदाबादला जायला विमानाने सव्वा तास लागतो. मात्र विमानतळावरचा वेळ जास्त असतो. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईहून अहमदाबादला किंवा अहमदाबादहून मुंबईला कमी वेळात आणि सुपरफास्ट पोहोचायचं असेल तर ती संधी आता मिळणार आहे. वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
advertisement
2/6
भारतीय रेल्वेच्या इतिहासात २०२७ हे वर्ष सुवर्णअक्षरांनी लिहिले जाणार आहे. देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वंदे भारत'चे आतापर्यंतचे सर्वात प्रगत 'व्हर्जन ४.०' लाँच करण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने पूर्ण केली आहे. ही ट्रेन ताशी २५० किलोमीटरच्या थक्क करणाऱ्या वेगाने धावेल, असा दावा करण्यात आला आहे.
advertisement
3/6
वंदे भारतचे जनक मानले जाणारे रेल्वे तज्ज्ञ सुधांशु मणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन व्हर्जन सर्वात आधी मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. या हाय-स्पीड ट्रेनमुळे दोन मोठ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे.
advertisement
4/6
विशेष म्हणजे, भविष्यात या ट्रेनचा वेग ताशी ३५० किलोमीटरपर्यंत वाढवता येईल, अशा पद्धतीने 'हाय-स्पीड कॉरिडॉर'साठी ही ट्रेन डिझाइन केली जात आहे. केवळ वेगच नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात 'KAVACH 5.0' ही आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
advertisement
5/6
यामुळे दोन ट्रेनमधील टक्कर रोखणे अधिक प्रभावी होईल. याशिवाय, ऊर्जा बचतीचे तंत्रज्ञान आणि आरामदायी प्रवासासाठी प्रीमियम फिचर्स या ट्रेनमध्ये असतील. 2019 मध्ये पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेन लाँच करण्यात आली होती. 2047 पर्यंत 4500 ट्रेन सुरू करण्याचं टार्गेट आहे.
advertisement
6/6
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 'वंदे भारत स्लीपर'ची सुरुवात झाली आहे. २०३० पर्यंत देशात ८०० वंदे भारत चालवण्याचे लक्ष्य मोदी सरकारचं आहे. सध्याच्या घडीला देशात १६४ वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत, ज्यांनी २७४ जिल्ह्यांना रेल्वे नेटवर्कशी जोडले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
250 किमीचा वेग अन् विमानासारखा प्रवास, बुलेट ट्रेनला विसराल असा रेल्वेचा नवा प्लॅन