140 चा वेग अन् काळजाचा थरकाप, राजधानी एक्सप्रेसनं हत्तींच्या कळपाला उडवलं, 5 डबे घसरले
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सायरंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस हत्तींच्या कळपाला धडकली, पाच डबे रुळावरून घसरले, प्रवासी सुखरूप, हत्तींचा मृत्यू, प्रशासनाने तातडीने मदत केली.
advertisement
1/7

प्रवासी गाढ झोपेत होते, राजधानी एक्स्प्रेस सुस्साट रुळावरुन चालली होती. 130-140 चा स्पीड अन् अचानक थरकाप उडवणारी घटना घडली. धक्का बसल्यासारखं झालं आणि पाच डबे रुळावरुन खाली घसरले. झोपेत असलेले प्रवासी खडबडून जागे झाले. गोंधळ सुरू झाला आणि नंतर जे समोर आलं ते भयंकर होतं.
advertisement
2/7
सायरंग-नवी दिल्ली (२०५०७) राजधानी एक्स्प्रेसची हत्तींच्या एका कळपाला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत रेल्वेचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून खाली घसरले. सुदैवानं प्रवासी सुखरुप आहेत, हिसका बसला. मात्र या भीषण अपघातात मुक्या जीवांना आपला जीव गमवावा लागला.
advertisement
3/7
या अपघातात हत्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. २० डिसेंबर २०२५, पहाटेची २:१७ वाजताची वेळ, जमुनाममुख आणि कांपूर रेल्वे सेक्शनदरम्यान ही राजधाणी एक्स्प्रेस वेगाने धावत होती. सर्व काही सुरळीत असतानाच अचानक अंधारात हत्तींचा एक कळप रेल्वे रुळावर आला
advertisement
4/7
विशेष म्हणजे, हा भाग अधिकृत 'हत्ती कॉरिडॉर' म्हणून घोषित नसल्याने तिथे हत्ती येण्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. रुळावर हत्ती दिसताच लोको पायलटने प्रसंगावधान राखून तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावला. मात्र, अंधार आणि वेग यामुळे धडक टाळणे अशक्य झालं असावं.
advertisement
5/7
लोको पायलटने लावलेल्या त्या आपत्कालीन ब्रेक्सनी कदाचित एका मोठ्या संकटापासून प्रवाशांना वाचवले. धडक इतकी भीषण होती की, इंजिन आणि त्यानंतरचे पाच डबे रुळावरून घसरले. डबे घसरताच प्रवाशांमध्ये गोंधळ सुरू झाला, पण रेल्वे प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा तातडीने सक्रिय झाली.
advertisement
6/7
लुमडिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महाव्यवस्थापक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नसल्याची खात्री होताच प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. अपघातामुळे विस्कळीत झालेल्या प्रवाशांना धीर देण्यात आला. डबे घसरलेल्या प्रवाशांना रेल्वेच्या इतर डब्यांमधील रिकाम्या बर्थवर तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले.
advertisement
7/7
पहाटेचा तो कडाक्याचा गारठा आणि भीतीदायक वातावरणात रेल्वे कर्मचारी प्रवाशांच्या मदतीसाठी रात्रभर उभे होते. अखेर सकाळी ६:११ वाजता ही राजधाणी एक्स्प्रेस गुवाहाटीकडे रवाना झाली, जिथे प्रवाशांसाठी अतिरिक्त डबे जोडून त्यांचा पुढचा प्रवास सुरक्षित केला जाणार आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
140 चा वेग अन् काळजाचा थरकाप, राजधानी एक्सप्रेसनं हत्तींच्या कळपाला उडवलं, 5 डबे घसरले