Bus Accident: खतरनाक! एकमेकांमध्ये घुसल्या बस, जागीच चक्काचूर उरला फक्त सांगाडा, 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शिवगंगा जिल्ह्यात कुम्मनगुडीजवळ दोन प्रवासी बसेसची भीषण धडक झाली, 12 मृत्यू, 40 हून अधिक जखमी, बचावकार्य रात्रीपर्यंत सुरू, तपास सुरू.
advertisement
1/6

काळ आणि वेळ आली आणि रविवार संध्याकाळ घातवार ठरवून गेली, दोन ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्या, त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं. ही धडक इतकी भयंकर होती की दुसऱ्या बसचा एक भाग पूर्ण चिरला गेला होता. फक्त सांगाडा शिल्लक होता. तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील कुम्मनगुडीजवळ आणि कुंद्रकुडी परिसरात रविवारी हा भीषण अपघात झाला.
advertisement
2/6
या भीषण अपघातात 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक जखमी झाले आहेत. दोन राज्य सरकारच्या प्रवासी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली, हा अपघात इतका जीवघेणा होता की, घटनास्थळी बघ्यांनी आणि बचाव पथकांनी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहिले.
advertisement
3/6
IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, धडकेचा आघात इतका जबरदस्त होता की, अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. बसच्या पत्र्याच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकले होते. प्रत्यक्षदर्शींनी वर्णन केल्यानुसार, अपघातानंतर लगेचच प्रवाशांचे आक्रोश, मदतीसाठी ओरडणे आणि रस्त्यावर तुटलेल्या काचांचा खच पडलेला होता. स्थानिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पोलीस आणि बचाव पथकाला जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
advertisement
4/6
अपघातानंतर तातडीने जखमींना शिवगंगा आणि कारैकुडी येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं, कुणाच्या डोक्याला गंभीर जखमा आणि तर कुणी मानसिक धक्क्यातून सावरत नव्हतं.अनेक प्रवाशांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बसेस विरुद्ध दिशेने येत असताना त्यांची टक्कर झाली.
advertisement
5/6
तामिळनाडूमध्ये अपघातांची ही दुसरी मोठी घटना आहे. याआधी २४ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूतील तेन्कासी जिल्ह्यात दोन प्रवासी बसेसची टक्कर झाली होती, ज्यात एका लहान मुलासह किमान सहा लोकांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल झाले होते. एएनआय (ANI) च्या अहवालानुसार, जखमींना हात, पाय आणि डोक्याला गंभीर फ्रॅक्चर झाले होते. दुसरीकडे, तेलंगणामधील महबूबनगर जिल्ह्यातील हनवाडा मंडल येथे एथेनॉल टँकरने लोखंडी कॉईल्स घेऊन जाणाऱ्या लॉरीला धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
advertisement
6/6
शिवगंगा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर सुमारे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी नंतर पूर्ववत केली. पोलिसांनी या दुर्दैवी रस्ते अपघाताची औपचारिक तपासणी सुरू केली आहे आणि अपघाताच्या अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Bus Accident: खतरनाक! एकमेकांमध्ये घुसल्या बस, जागीच चक्काचूर उरला फक्त सांगाडा, 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू