TRENDING:

7100000 रुपयांच्या नोटा, 3800000 रुपयांचं सोनं, शाही लग्नाचा थाट, कोण आहे हा युट्यूबर?

Last Updated:
अरुण पंवारच्या शाही लग्नात ७१ लाख रुपये आणि २१० ग्रॅम सोनं हुंड्यात मिळालं. व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
advertisement
1/7
7100000 रुपयांच्या नोटा, 21 तोळे सोनं, युट्यूबरच्या लग्नाचा थाट, कोण हा तरुण?
असं कुठं असतं काय? असं लग्न जे डोळे दिपवून टाकेल, पैसे मोजून थकायला होईल पण हुंड्याच्या नावाखाली दान म्हणून जे सोनं आणि पैसे घेण्यात आले त्याची मात्र तुफान चर्चा होत आहे. प्रसिद्ध युट्यूबरच्या लग्नात चक्क 71 लाख रुपयांची कॅश आणि 210 ग्रॅम सोनं हुंड्यास्वरुपी देण्यात आलं. शाही लग्नाचा थाट आणि प्रत्येक नातेवाईकानं किती सोनं चांदी आणि पैसे दिले याचं जाहीर वाचनही करण्यात आलं.
advertisement
2/7
लग्नाचा थाट, शाही सोहळा इतकं सगळं कमी म्हणून पैसे आणि दागिने लग्नात दिलेली अमाप भेट या सगळ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. हुंड्याच्या नावाखाली दान म्हणून हे घेतलेले पैसे आणि सोन्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
advertisement
3/7
आपल्या युट्यूब चॅनेलवर महागड्या गाड्यांचे रिव्ह्यू करणाऱ्या अरुणला त्याच्या स्वतःच्या लग्नात जे 'गिफ्ट' मिळालंय, ते पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले आहेत. 'लग्न टीका' विधीचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात ७१ लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांची जणू बरसातच झाल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
4/7
अरुण पंवार हा गाड्यांच्या विश्वातील मोठं नाव. ३० जानेवारीला त्याच्या घरी पलवलहून पाहुणे चक्क सोनं चांदी आणि पैसे घेऊन आले. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात कागद घेऊन वधू पक्षाने काय काय दिलंय, याची यादी वाचताना दिसतेय.
advertisement
5/7
७१ लाख रुपये रोख आणि तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने! यात केवळ नवरदेवासाठीच नाही, तर त्याच्या वडिलांपासून ते वहिनीपर्यंत प्रत्येकासाठी सोन्याचे दागिने देण्यात आले आहेत. अरुणने स्वतः हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि काही वेळातच तो वाऱ्यासारखा पसरला.
advertisement
6/7
अरुणची जीवनसाथी डॉ. तिथी ही पलवलची राहणारी आहे. तिथीचं कुटुंब मूळचं गहबल गावचं असलं तरी सध्या ते शहरात स्थायिक आहे. तिथीने केवळ एमबीबीएसच केलं नाही, तर ती सध्या जयपूरमधून एमडीचं शिक्षण घेत आहे. तिचं संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असून भाऊदेखील रोहतक पीजीआयमध्ये डॉक्टर आहे.
advertisement
7/7
सोहना येथील एका छोट्या गावातून आलेल्या अरुण पंवारचा प्रवास थक्क करणारा आहे. २०१९ मध्ये त्याने कार रिव्ह्यू करायला सुरुवात केली. आज त्याच्याकडे फॉर्च्युनर, थार आणि एंडेव्हरसारख्या गाड्यांचा ताफा आहे. बीसीए केलेला हा तरुण आज केवळ युट्यूबर राहिला नसून त्याने स्वतःचा बिझनेसही सुरू केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
7100000 रुपयांच्या नोटा, 3800000 रुपयांचं सोनं, शाही लग्नाचा थाट, कोण आहे हा युट्यूबर?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल