Woman harassed Man : महिलेचा पुरुषावर लैंगिक अत्याचार, काय आहेत कायदे, मदत कुठे मिळते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indian Law For Men : भारताच्या IPC 375 अंतर्गत बलात्काराची व्याख्या अद्याप gender-neutral नाही. म्हणजेच महिला पुरुषावर बलात्कार करते अशी परिभाषा कायद्यात थेटपणे नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की पुरुष पीडितांसाठी कायद्याचं संरक्षण नाही.
advertisement
1/7

पुण्यात एका महिलेनं एका पुरुषावर लैंगिक अत्याचार केल्याची बातमी आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. लैंगिक अत्याचार म्हटलं की पुरुषांचा महिलांवर, म्हणजे लैंगिक अत्याचाराबाबत चर्चा महिलांपुरतीच मर्यादित राहते. पण लैंगिक अत्याचाराचे शिकार पुरुषही होऊ शकतात आणि हे वास्तव समाजात फार कमी मान्य केलं जातं.
advertisement
2/7
भारताच्या IPC 375 अंतर्गत बलात्काराची व्याख्या अद्याप gender-neutral नाही. म्हणजेच महिला पुरुषावर बलात्कार करते अशी परिभाषा कायद्यात थेटपणे नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की पुरुष पीडितांसाठी कायद्याचं संरक्षण नाही. महिलांकडून पीडित असलेल्या पुरुषांनाही मदत मिळते, त्यांच्यासाठीही हेल्पलाईन आणि कायदे आहेत.
advertisement
3/7
IPC 377 (gender-neutral) - कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीने कोणत्याही लिंगावर जबरदस्तीने केलेले असहमतिपूर्ण लैंगिक कृत्य दंडनीय. IPC 354 A–D - लैंगिक छळ, स्टॉकिंग, बळजबरी, जरी मुख्यतः स्त्रियांसाठी असलं तरी अनेक राज्यांत पुरुष तक्रारीही स्वीकारल्या गेल्या आहेत.
advertisement
4/7
IPC 323, 324, 504, 506 - मारहाण, धमकी, अपमान, जबरदस्ती. IPC 384 - ब्लॅकमेल, आर्थिक शोषण. IT Act 2000 - ऑनलाइन छळ, धमकी, ब्लॅकमेल.
advertisement
5/7
POSH Act - कंपन्यांत असलेला हा कायदा महिलांसाठी मानला जातो. पण अनेक कंपन्या gender-neutral अंमलबजावण करतात. म्हणजे फक्त महिलाच नाही तर पुरुष कर्मचारीही तक्रार करू शकतात.
advertisement
6/7
पुरुष पीडितांसाठी भारतात काही महत्त्वाच्या संस्था उपलब्ध आहेत. मेन वेल्फेअर ट्रेस, सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन (SIFF), भारतीय पत्नी अत्याचारा विरोधी परिषद, मेन हेल्पलाईन इंडिया - इथं कायदेशीर आणि भावनिक दोन्ही मदत मिळते.
advertisement
7/7
मानसिक आधारासाठी iCall (TISS), फोर्टिस स्ट्रेस हेल्पलाईन, स्नेही तसंच ऑनलाइन थेरपी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तसंच 100 / 112, cybercrime.gov.in, आणि डिस्ट्रीक्च लिगल सर्व्हिसे ऑथोरिटिकडून मोफत कायदेशीर मदतही मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Woman harassed Man : महिलेचा पुरुषावर लैंगिक अत्याचार, काय आहेत कायदे, मदत कुठे मिळते?