TRENDING:

Fridge : तुमच्या फ्रिजचाही स्फोट होणार नाही ना? ब्लास्टआधी फ्रिजमधून येऊ शकतात असे आवाज, दुर्लक्ष नको

Last Updated:
Fridge Noise Before Blast : फ्रिजमधून अनेक प्रकारचे आवाज येत असतात. यातील काही आवाज सामान्य, तर काही धोक्याचे संकेत असू शकतात. फ्रिजच्या प्रत्येक आवाजाचा अर्थ तुम्हाला माहिती असायला हवा.
advertisement
1/7
तुमच्या फ्रिजचाही स्फोट होणार नाही ना? ब्लास्टआधी फ्रिजमधून येऊ शकतात असे आवाज
मुंबईतील एका घरात फ्रिजचा ब्लास्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तुमच्या घरातील फ्रिजही असा धोकादायक असू शकतो, कधीची फ्रिजचा असा स्फोट होऊ शकतो. फ्रिजमधून मधेमधे येणारे आवाज म्हणजे या धोक्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे या आवाजाकडे दुर्लक्ष नको. वेळीच आवाज ओखला तर फ्रिजचा स्फोट टाळता येऊ शकतो.
advertisement
2/7
मोठा घरघर किंवा गुरगुर आवाज म्हणजे कम्प्रेसरवर जास्त ताण, गॅस प्रेशरची समस्या, फ्रिज जुना होणं. यामुळे वीजबिल अचानक वाढते, कम्प्रेसर जळण्याची शक्यता वाढते. फ्रिज मागे भिंतीला चिकटलेला नाही ना ते पाहा आवाज सतत असेल तर टेक्निशियनला दाखवा.
advertisement
3/7
कटकट किंवा क्लिक-क्लिक आवाज म्हणजे रिले किंवा स्टार्ट स्विचमध्ये बिघाड, वीजपुरवठा अनियमित आहे. यामुळे कम्प्रेसर सुरू होत नाही, अचानक फ्रिज बंद पडू शकतो. प्लग सैल नाही ना तपासा, स्टेबलायझर वापरा.
advertisement
4/7
श्श्श… असा हवा सुटल्यासारखा आवाज म्हणजे रेफ्रिजरंट गॅस सर्क्युलेशन, डीफ्रॉस्ट प्रक्रियेतील सामान्य आवाज आहे. हा आवाज क्वचित आणि हलका असेल तर सामान्य आहे. पण सतत आणि मोठा आवाज असेल तर गॅस लीकचा संशय आहे. यासोबत कुलिंग कमी होत असेल तर तात्काळ सर्व्हिस कॉल करा.
advertisement
5/7
बर्फ तुटल्यासारखा आवाज म्हणजे डीफ्रॉस्ट सायकल सुरू आहे, फ्रीझरमध्ये जास्त बर्फ साचला आहे. फार जास्त बर्फ म्हणजे कूलिंग कमी आणि मोटरवर ताण.अशावेळी फ्रीझर साफ करा, दरवाजा नीट बंद होतोय का पाहा.
advertisement
6/7
जळल्यासारखा आवाज किंवा वास म्हणजे वायरिंग गरम होत आहे, कम्प्रेसर ओव्हरहिट झालं आहे. हे खूप धोकादायक आहे, यामुळे आग लागण्याचा धोका आहे. अशावेळी लगेच फ्रिज बंद करा, लगेच प्लग काढा आणि टेक्नशियनला बोलवा
advertisement
7/7
खडखड किंवा कंपनाचा आवाज म्हणजे फ्रिज समतल जमिनीवर नाही, मागील कॉइल किंवा फॅन सैल आहे. अशावेळी आवाज अधिक वाढतो. मग अशावेळी फ्रिज लेव्हलवर ठेवा, मागील बाजू साफ करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Fridge : तुमच्या फ्रिजचाही स्फोट होणार नाही ना? ब्लास्टआधी फ्रिजमधून येऊ शकतात असे आवाज, दुर्लक्ष नको
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल