TRENDING:

पुरुषांनो सावधान! लॅपटॉप मांडीवर घेऊन वापरताय? प्रजनन क्षमतेवर होतो थेट परिणाम; तज्ज्ञ सांगतात...

Last Updated:
आरोग्य तज्ज्ञांनुसार, लॅपटॉपचा बराच काळ मांडीवर घेऊन वापर करणे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. लॅपटॉपमधून बाहेर पडणारी उष्णता वृषणांचे...
advertisement
1/8
पुरुषांनो सावधान! लॅपटॉप मांडीवर घेऊन वापरताय? प्रजनन क्षमतेवर होतो थेट परिणाम!
लॅपटॉपचा वापर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी (male fertility) धोकादायक ठरू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बराच काळ लॅपटॉप मांडीवर घेऊन वापरल्याने पुरुषांच्या प्रजनन आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
2/8
लॅपटॉपमधून बाहेर पडणारी उष्णता आणि चुकीच्या स्थितीत बराच वेळ बसल्याने ऑलिगोस्पर्मिया (शुक्राणूंची संख्या कमी होणे) सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.
advertisement
3/8
डॉक्टरांनी याबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे की, लॅपटॉपमधून निघणारी उष्णता वृषणांचे (testicles) तापमान वाढवू शकते, ज्यामुळे शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो.
advertisement
4/8
निरोगी शुक्राणूंच्या विकासासाठी वृषणांचे तापमान शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा थोडे कमी असणे आवश्यक असते. मात्र, मांडीवर लॅपटॉप ठेवून जास्त वेळ काम केल्याने हे संतुलन बिघडते, ज्यामुळे प्रजनन आरोग्याला हानी पोहोचते.
advertisement
5/8
डॉ. अनुपम सैकिया यांनी सांगितलं आहे की, लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेच्या संपर्कात आल्याने शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
advertisement
6/8
जे पुरुष दररोज तासनतास लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करतात, त्यांना प्रजनन समस्यांचा धोका जास्त असतो. याव्यतिरिक्त, तज्ज्ञांनी असंही निरीक्षण नोंदवलं आहे की, मांडीवर लॅपटॉप घेऊन काम केल्याने हाडे आणि स्नायूंच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
advertisement
7/8
हा धोका टाळण्यासाठी, डॉक्टरांनी लॅपटॉप टेबलवर किंवा कूलिंग पॅडवर वापरण्याचा सल्ला दिला आहे. ज्या पुरुषांना कुटुंब नियोजनाचा विचार आहे, त्यांना या धोक्यांबद्दल जागरूक राहून लॅपटॉपचा सुरक्षित वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
8/8
आरोग्य तज्ज्ञ नियमित वैद्यकीय तपासणीच्या महत्त्वावरही भर देत आहेत, विशेषतः ज्यांच्या दैनंदिन जीवनात लॅपटॉपचा वापर जास्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
पुरुषांनो सावधान! लॅपटॉप मांडीवर घेऊन वापरताय? प्रजनन क्षमतेवर होतो थेट परिणाम; तज्ज्ञ सांगतात...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल