Modak: पुण्यात 'या' 5 ठिकाणी मिळतात मऊ आणि टेस्टी मोदक, एकदा चव चाखून बघा प्रेमातच पडाल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Popular Ukadiche Modak in Pune: पुण्यात उकडीच्या मोदकांसाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, ज्यामध्ये चितळे बंधू, जोशी स्वीट्स, दादूज स्वीट्स, मोदक घर आणि काका हलवाई यांचा समावेश होतो. खवय्यांना तिथे पारंपरिक आणि चविष्ट उकडीचे मोदक मिळतात. 2026 या वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी उद्या असणार आहे. यासाठी वेगवेगळ्या गणपती मंदिरांमध्ये जोरदार सध्या जोरदार तयारी सुरू आहे. जर तुम्ही सुद्धा 'मोदक प्रेमी' असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुण्यामध्ये असे कोणतो मोदक शॉप आहेत, की जिथे तुम्ही जाऊन खरेदी करू शकता, चला जाणून घेऊया...
advertisement
1/5

चितळे बंधू- पुण्यातील डेक्कनमधील जिमखान्याजवळ चितळे बंधूंचं शॉप इथे आहे. या शॉपमधून तुम्हाला मोदकचे वेगवेगळ्या व्हरायटी खायला मिळतील. उकडीचे मोदक, मावा स्पेशल मोदक, ड्रायफ्रुट्स मोदक, चॉकलेट मोदकसह वेगवेगळ्या मोदक तुम्हाला इथे खायला मिळेल.
advertisement
2/5
जोशी स्वीट्स- एरंडवणे परिसरामध्येच जोशी स्वीट्सचे शॉप आहे. या शॉपमध्येही तुम्हाला मोदकचे वेगवेगळ्या व्हरायटी खायला मिळतील. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, मावा स्पेशल मोदक, ड्रायफ्रुट्स मोदक, चॉकलेट मोदकसह वेगवेगळ्या मोदकच्या व्हरायटी तुम्हाला इथे खायला मिळेल.
advertisement
3/5
दादू स्वीट्स- शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये तुम्हाला दादू स्वीट्स हे शॉप पाहायला मिळेल. या शॉपमध्ये सुद्धा मोदकाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. मावा स्पेशल मोदक, वेगवेगळ्या कलर्सचे मोदक, ड्रायफ्रुट्स मोदक, चॉकलेट मोदकसह वेगवेगळ्या मोदकच्या व्हरायटी तुम्हाला इथे खायला मिळेल.
advertisement
4/5
मोदक घर- कोथरूड आणि कर्वे नगरमध्ये मोदक घर आहे. उकडीच्या मोदकासाठी फेमस असलेल्या या शॉपमध्ये तुम्ही नक्की व्हिझिट करू शकता. अंगारकी चतुर्थीनिमित्त तुम्ही या ठिकाणी उकडीच्या मोदकांची ऑर्डर देऊ शकता. मोदक घर फक्त आणि फक्त उकडीच्या मोदकांसाठी फेमस आहे.
advertisement
5/5
काका हलवाई- पुण्यामध्ये अनेक ठिकाणी या स्वीट्स शॉपचे शॉप्स आहेत. बुधवार पेठेजवळ असलेल्या तुळशीबागेमध्ये काका हलवाईचे शॉप्स आहेत. या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला मोदकाच्या व्हरायटी मिळतील. पारंपरिक आणि चवदार मोदकांसाठी काका हलवाईची संपूर्ण पुण्यामध्ये ओळख आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Modak: पुण्यात 'या' 5 ठिकाणी मिळतात मऊ आणि टेस्टी मोदक, एकदा चव चाखून बघा प्रेमातच पडाल