TRENDING:

Khadakwasla Dam: 35 तास अन् विक्रमी 276 मिमी पाऊस, खडकवासल्यातून 39,000 क्युसेक विसर्ग, बघा PHOTO

Last Updated:
Khadakwasla Dam: पुणे जिल्ह्यात असलेल्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पानशेत खोर्‍यातील घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून सोडलेल्या पाण्याची भर खडकवासला धरणात पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
advertisement
1/5
35 तास अन् विक्रमी 276 मिमी पाऊस, खडकवासल्यातून 39,000 क्युसेक विसर्ग, बघा PHOTO
खडकवासला धरणातून बुधवारी (20 ऑगस्ट) सकाळी तब्बल 39 हजार 138 क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. रायगड घाटमाथा, पानशेत आणि वरसगाव धरणखोऱ्यात मुसळधार पावसामुळे पुण्यातील या महत्त्वाच्या धरणसाखळीत 98 टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे.
advertisement
2/5
खडकवासला परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. टेमघरमध्ये मंगळवारी सकाळी 6 ते बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 35 तासांत विक्रमी 276 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पानशेतमध्ये 182 मिलीमीटर, वरसगावमध्ये 195 मिलीमीटर आणि खडकवासलामध्ये 88 मिलीमीटर पाऊस पडला.
advertisement
3/5
या पावसामुळे मोसे, आंबी, मुठा नद्यांसह अनेक ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पानशेतमधून 10,112 क्युसेक, वरसगावमधून 10,105 क्युसेक, तर टेमघर धरणातून 3,122 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात आहे.
advertisement
4/5
19 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दोन दिवसांत मुठा नदीत तब्बल 2 टीएमसी पाणी सोडलं गेलं. यंदा पावसाळ्यात आतापर्यंत मुठा नदीत एकूण 14.81 टीएमसी पाणी सोडलं गेलं आहे. त्यामुळे मुठेच्या किनारी असलेल्या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement
5/5
पानशेत खोर्‍यात दुपारपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याची आवक कमी झाली आहे. पुन्हा जोरदार पाऊस झाला नाही तर खडकवासला धरणातून होणार विसर्ग कमी केला जाईल. जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी याबाबत माहिती दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Khadakwasla Dam: 35 तास अन् विक्रमी 276 मिमी पाऊस, खडकवासल्यातून 39,000 क्युसेक विसर्ग, बघा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल